Sanjay Raut Ravi Rana : मुलाकात हुई, क्या बात हुई? राज्यात भांड भांड भांडले, लडाखमध्ये एकत्र न्याहरी, राऊत आणि राणांची बातच न्यारी!

Sanjay Raut Ravi Rana : मुलाकात हुई, क्या बात हुई? राज्यात भांड भांड भांडले, लडाखमध्ये एकत्र न्याहरी, राऊत आणि राणांची बातच न्यारी!
संजय राऊत, रवी राणा
Image Credit source: Twitter

शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, वैयक्तिक टीकाही झाली. माध्यमांसमोर एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नेते लडाखमध्ये मात्र एकत्र न्याहरी करताना आणि गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाले!

सागर जोशी

|

May 19, 2022 | 7:36 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी राज्यातील राजकारण तापवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणारच, असा इशारा राणा दाम्पत्यानं दिला. त्यावरुन राणा दाम्पत्याला तब्बल 12 दिवस जेलवारीही करावी लागली. त्यावरुन जे राजकारण झालं ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि नवनीत राणा, रवी राणा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, वैयक्तिक टीकाही झाली. माध्यमांसमोर एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नेते लडाखमध्ये मात्र एकत्र न्याहरी करताना आणि गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाले!
Sanjay Raut and Ravi Rana

संजय राऊत, रवी राणांचे लडाखमधील फोटो व्हायरल

मुलाकात हुई, क्या बात हुई?

परराष्ट्र व्यवहार समिती सदस्य लडाखच्या दौऱ्यावर होते. या समितीचे सदस्य या नात्याने खासदार नवनीत राणा यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि समितीचे अन्य सदस्यही लडाखमध्ये होते. त्यावेळी संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांच्या काही फोटो समोर आले आहेत. या दोघांचा नाष्टा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे दोघे बोलताना दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यात एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका करणारे हे नेते लडाखमध्ये भेटतात आणि गप्पा गोष्टी करतात. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
Sanjay Raut and Ravi Rana 1

संजय राऊत, रवी राणांचे लडाखमधील फोटो व्हायरल

नवनीत राणांची सैनिक कॅम्पला भेट

नवनीत राणा यांनी ट्वीटरद्वारे लडाख दौऱ्यावेळी भारत, चीन, पाकिस्तान सीमेवरील सैनिक कॅम्पला भेट दिल्याची माहिती दिली. त्यावेळी शहीद जवानांना आदरांजली वाहिली आणि सैनिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचं सांगितलं.

 

हे सुद्धा वाचा

राणा दाम्पत्याचं अमरावतीत जंगी स्वागत होणार

दरम्यान, राणा दाम्पत्य 28 मे रोजी महाराष्ट्रात परतणार आहे. त्यांच्या वापसीचा मेगाप्लानही तयार करण्यात आलाय. 28 मे रोजी दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर दीडच्या सुमारास ते नागपूरमधील रामनगर चौक इथल्या हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालिसाचं पठण करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता अमरावतीकडे प्रयाण केल्यानंतर तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ, याठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. तर संध्याकाळी 5 वाजता अमरावती शहरात आगमन झाल्यावर विविध चौकात त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर 7 वाजता दसरा मैदानातील हनुमान मंदिरात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें