AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात! पत्रा चाळ प्रकरणात राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या (ED) कोठडीत आहेत, त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात! पत्रा चाळ प्रकरणात राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
संजय राऊत, शिवसेना खासदारImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 4:45 PM
Share

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी (ED) कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 जुलै रोजी ईडीचं एक पथक  संजय राऊत  यांच्या निवासस्थानी चौकशी साठी दाखल झाले होते. पत्रा चाळ प्रकरणात  त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वर्षा राऊत यांचीही चौकशी

दरम्यान पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील दोन दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.  वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून काही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणात वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. पत्रा चाळमधील काही भूखंड हा खासगी बिल्डरला विकून त्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.

तुरुंगात असताना लेख कसा लिहिला?

दरम्यान रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानमधून रोखठोक या सदरात संजय राऊत यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेले संजय राऊत हे काय स्वातंत्र्यसेनानी आहेत का जे तुरुंगातून लेख लिहितात असं त्यांनी म्हटलं होतं. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. तुरुंगात असताना जर अशा पद्धतीने लेख लिहायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता असते. असं ईडीने म्हटलं होतं, आता या प्रकरणात देखील संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.