AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांकडून महाराष्ट्राशी गद्दारी, केंद्राकडे 40 हजार कोटी वळवल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत भडकले

देवेंद्र फडणवीसांनी गद्दारी केल्यचा घणाघात संजय राऊतांनी केला, तर अनंतकुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असल्यास नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली

फडणवीसांकडून महाराष्ट्राशी गद्दारी, केंद्राकडे 40 हजार कोटी वळवल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत भडकले
| Updated on: Dec 02, 2019 | 11:28 AM
Share

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवत महाराष्ट्राशी गद्दारी केली, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut slams Devendra Fadnavis) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री होण्यामागे मोठा कट होता, त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला.

‘अनंतकुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, केंद्राकडून नेहमी सावत्र भावासारखी वर्तणूक देण्यात येते, आता हे स्पष्ट होतं’ असं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मिळणारे केंद्राचे पैसे परत केले असतील, तर त्यांचा निषेध केला जाईल. महाराष्ट्राच्या विकासाबाबत कुठलाही प्रकार खपवून घेणार नाही’ असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी केला.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करुन महाराष्ट्राशी द्रोह असल्याचा घणाघात केला आहे.

काय म्हणाले अनंतकुमार हेगडे?

“तुम्हा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस (फडणवीस) 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत” असं अनंत कुमार हेगडे सांगत होते.

‘मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला”, असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.

इतकंच नाही तर भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. यासाठीच हे ठरवण्यात आलं की त्यासाठी एक नाटक रचावं लागेल. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला, असा दावाही अनंतकुमार हेगडे यांनी केला.

तो व्हायरल मेसेज खरा?

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत आहे. देवेंद्र फडणवीसांनी शपथ का घेतली, याबाबत या मेसेजमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. मात्र हा मेसेज खरा की खोटा याबाबत स्पष्टता होऊ शकत नाही. मात्र अनंत कुमार हेगडे यांच्या गौप्यस्फोटाने तो व्हायरल मेसेज खरा आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलं आहे?

“महाराष्ट्रात अजित पवारांना हाताशी धरताना भाजपकडून बहुमताची गणितं फसली किंवा चूक झाली, असं तुम्हाला वाटत असेल. पण तो एक सुनियोजित आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. का ? हे वाचा.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला आहे. केंद्र, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार या निधीवर नियंत्रण ठेवतात. जपानची इच्छा नसली, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळवायचा होता. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी जपान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द होईल. आणि काँग्रेसला कर्जमाफीच्या नावाखाली निधी काढून घेण्यास मदत होईल.

22 नोव्हेंबरपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यांना ही रक्कम केंद्रीय निधीत हस्तांतरित करता आली नव्हती. म्हणून त्यांनी अजित पवार (अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा गेम प्लॅन) यांच्याशी करार केला आणि 159 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं दिली. म्हणून घाईगडबडीत हा शपथविधी उरकण्यात आला.

फडणवीसांनी जवळजवळ सर्व रक्कम केंद्राच्या तिजोरीत वर्ग केली आहे. यामुळे नवीन सरकारला निधीला स्पर्श करणं अशक्य झालं आहे. फडणवीसांनी राजीनामा दिला, पण त्यांना काँग्रेसला बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखता आलं.

सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये धरलेला आग्रह हा शेतकरी कर्जमाफीचा असला (कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच घोटाळा करण्याचा सर्वात सोपा मार्ग) तरी त्यामागे मोदींचं महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं स्वप्न रोखण्याचा उद्देश होता.

अजित पवारांना याची कल्पना नव्हती आणि त्यांना वाटलं की आपण उपमुख्यमंत्री होऊ शकतो. तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर सोपवलेलं निर्धारित काम पूर्ण केलं”, असं व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

Sanjay Raut slams Devendra Fadnavis

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.