‘असा मोहरा कधी न जाहला’, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राऊतांकडून दंडवत, पवार-खडसेंचीही आदरांजली

'असा मोहरा कधी न जाहला', बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राऊतांकडून दंडवत, पवार-खडसेंचीही आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेते बाळासाहेबांच्या आठवणी जागवत आहेत तसंच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत.

Akshay Adhav

|

Nov 17, 2020 | 10:48 AM

मुंबईहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेते बाळासाहेबांच्या आठवणी जागवत आहेत तसंच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय  राऊत यांनी ‘असा मोहरा कधी न जाहला’, असं म्हणत आपल्या शीर्षस्त नेत्याला साष्टांग दंडवत घातला आहे. (Sanjay Raut tribute Balasaheb Thackeray on His Death Anniversary)

‘असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार… बाळासाहेब ठाकरे नाव जगात गर्जत राहणार’, अशा शब्दात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंसारखा अद्वितीय नेता होणं शक्य नाही. गेल्या आठ वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत साहेब आम्हाला पोरके करुन गेले, असे भावनिक उद्गार संजय राऊत यांनी काढले.

शिवसेना नेत्यांबरोबरच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, आमदार रोहित पवार यांनी बाळाासहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजकीय कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या विजिगीषु वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त- शरद पवार

‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार व राजकीय भाष्यकार म्हणून कार्यकर्तृत्वही विशेष महत्त्वाचे होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजिगीषु वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यतिथी दिनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…

बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन- नितीन गडकरी

हिंदुहृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन

बाळासाहेबांना विनम्र आदरांजली- एकनाथ खडसे

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी… त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary Live Update)

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल होतील.

यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित रहाणार आहेत. कोविड 19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहे.

(Sanjay Raut tribute Balasaheb Thackeray on His Death Anniversary)

संबंधित बातम्या

Balasaheb Thackeray death anniversary LIVE | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें