‘स्वातंत्र्या, तुझी व्याख्या काय?’, सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच भाजपवरही पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे.

'स्वातंत्र्या, तुझी व्याख्या काय?', सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचा भाजपवर प्रहार
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 8:54 AM

मुंबई: कंगना रनौत, अर्वण गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिगत स्वातंत्याची गळचेपी होत असल्याची बोंब मारली जात आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या कणाकणात स्वातंत्र्य आहे. पण विषय असा आहे की, स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जात आहे. इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली असा सिद्धांत जे मांडतात ते तरी आज वेगळे काय करीत आहेत? स्वातंत्र्याची व्याख्या काय असा सवाल रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut’s criticism of the Central Investigation Agency)

इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी लादली गेली व पावलोपावली कायद्याचं उल्लंघन झालं. इंदिराजींच्या काँग्रेस राजद्यात कोणाला राज्यघटनेची पर्वा नव्हती आणि न्यायालयाची प्रतिष्ठाही वाटत नव्हती. हा भाजप पुढाऱ्यांचा मोठा आवडता सिद्धांत आहे. या सिद्धांताचा उपसिद्धांत असा की, भाजपचे पुढारी केंद्रीय तपास यंत्रणा व नय्यालयाच्या प्रतिष्ठेला जिवापाड जपत आहेत, पण या उपसिद्धांतात कसा फोलपणा आहे हे अलीकडच्या घटना, घडामोडींवरुन दिसत आहे. खरे म्हणजे सत्ता महत्वाची. त्यापुढे भाजपला कशाचीच पर्वा नाही, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे ती धोक्याची घंटाच आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा घोडेबाजार सुरु झाला आहे व महाराष्ट्रातही त्यासाठी विविध स्तरांवर राजकीय खानावळी व स्टॉल्स उभे केले आहेत. या स्टॉलवर कोणी फिरकला नाही म्हणून ईडीसारख्या संस्थांना पकडून स्टॉलवर जबरदस्तीने लोक आणण्याचा प्रयोग सुरु झाला. भाजपची केंद्रीय सत्ता असे बिंबवण्याचा प्रयत्न करित आहेत की, आम्ही सर्व सत्ताधीश आहोत. सर्वोच्च न्यायालयापासून ते सर्व स्तरांवरील तपाय यंत्रणांवर फक्त आमचीच हुकुमत चालते. आम्ही तुम्हाला रगडू शकतो. तेव्हा आमच्या स्टॉलवर रांग लावून उभे राहा. हे सर्व कसे आणि का सुरु आहे? असा प्रश्न रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारलाय.

‘केंद्रीय तपास यंत्रणां कळसूत्री बाहुल्या!’

यावेळी संजय राऊत यांनी कंगना रानौत, रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या कळसूत्री बाहुल्या झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय. ‘सीबीआयने स्वत:चे धिंडवडे स्वत:च काढले आहेत. ईडीसारख्या संस्था या राजकीय मालकांच्या कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर लोक संशय घेत आहेत. या संस्था म्हणजे राष्ट्राचा स्तंभ नसून सत्ताधाऱ्यांच्या चाकर बनत असतील तर अराजकाचा स्फोट होईल. सुडाचे हत्यार म्हणून या संस्थांचा वापर सुरु आहे. सूडबुद्धीने वागणारे सत्ता उबवू शकतात, पण राष्ट्र चालवू शकत नाहीत.’

मनमानी आणि स्वैराचार

व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा स्वैराचार नव्हे. एखादा गुन्हा तुमच्याविरुद्ध नोंदवल्यावर तपास आणि कारवाईसाठी पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये, पोलिसांनी आपल्या केसाला जरी धक्का लावला तर ते व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन ठरेल असं जर कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. विधानसभेने आणलेल्या हक्कभंगाबाबतही सर्वोच्च न्यायालय निर्णय देते आणि विधानसभेला कारवाईपासून रोखते. शासन यंत्रणा आणि विधिमंडळातील समतोल बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचं राऊत यांचं मत आहे.

जे सरकारविरोधात बोलतील आणि सरकारला प्रश्न विचारतील त्यांना कायद्याचे समान संरक्षण लाभणार नाही हे आता पक्के झाले आहे. मानवी स्वातंत्र्य महत्वाचेच आहे, पण त्या व्याख्येत देशाची 120 कोटी जनता बसत नाही. मूठभर लोकांसाठीच हे स्वातंत्र्य आहे. अलीकडच्या घटना तेच सांगत आहेत. स्वातंत्र्याला मालक निर्माण झाले आहेत. न्यायालयाने न्यायाची व्याख्याच बदलून टाकली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून केला आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut Exclusive | चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त, आम्ही कृती आणि अ‍ॅक्शनवाले : संजय राऊत

Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला

‘भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत’, संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut’s criticism of the Central Investigation Agency

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.