‘शिवसेनेचं घर उध्वस्त करणारा संजय राऊत, या पापाची प्रचिती उद्धव ठाकरेंना येतेय’, शिंदे गटाच्या आमदाराची जळजळीत टीका

संजय राऊत यांनी शिवसेनेचं घर उध्वस्त केलेलंय आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्यांनी ठासून बोलावं, असं आव्हान शिंदे गटाच्या आमदारानं केलंय.

'शिवसेनेचं घर उध्वस्त करणारा संजय राऊत, या पापाची प्रचिती उद्धव ठाकरेंना येतेय', शिंदे गटाच्या आमदाराची जळजळीत टीका
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 1:55 PM

दत्ता कनवटे,  औरंगाबादः वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi) ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) युती केली आहे. मात्र ऐन जागावाटपावेळी ही युती तुटणार अशी शक्यता राजकीय नेते व्यक्त करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीदेखील हीच शक्यता वर्तवली. उद्धव ठाकरे यांनी कुणासोबत जायचंय, हे ठरवण्यापेक्षा आधी शिवसेनेचं घर कुणामुळे उद्धवस्त झालं, याचा विचार करावा. हे घर उद्ध्वस्त करणारा संजय राऊत आहे. उद्धव ठाकरे यांनाही याची प्रचीती येत आहे, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

संजय शिरसाट काय म्हणाले?

वंचित – शिवसेना युतीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ही गणितं सोपी नसतात. मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो. प्रकाश आंबेडकरांचा एक स्वभाव आहे. त्यानुसारच ते बोलतील. ते यांना रुचणार नाहीत. त्यामुळे ही आघाडीही राहणार नाहीत..

आता कुणाबरोबर जायचंय, हे पाहण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी हे कुणामुळं झालं हे पहावं. आम्ही वारंवार सांगतोय, हे संपवायला संजय राऊत जबाबदार आहे. शिवसैनिकांनाही हे कळत नाहीये…

संजय राऊत यांनी शिवसेनेचं घर उध्वस्त केलेलंय आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्यांनी ठासून बोलावं. पण तो बोलू शकत नाही. कारण सगळेजण त्याच्या अंगावर तुटून पडतील. त्याच्या पापाची प्रचिती उद्धव ठाकरेंना आता यायला लागलीय, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

‘..संजय राऊत तेव्हा पेढे वाटतील’

प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर शरद पवार आक्षेप घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. अशा स्थितीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. असं झालं तर संजय राऊत पेठे वाटतील आणि शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसतील, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय..

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.