AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनं एखाद्या विजयामुळं हुरळून जाऊ नये, सतेज पाटलांचं टीकास्त्र

भाजपनं एखाद्या विजयाने त्यांनी हुरळून जायची गरज नाही, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. (Satej Patil BJP )

भाजपनं एखाद्या विजयामुळं हुरळून जाऊ नये, सतेज पाटलांचं टीकास्त्र
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
| Updated on: May 02, 2021 | 3:25 PM
Share

कोल्हापूर: काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूरसाठी इच्छुक अधिक होते, त्यांची सांगड घालून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेवदारी दिली होती. भाजपनं एखाद्या विजयाने त्यांनी हुरळून जायची गरज नाही. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. (Satej Patil slams BJP over the result of Pandharpur Mangalvedha by poll result)

पंढरपूरमध्ये स्वाभिमानीला किती पडली हे पाहावं लागेल

सतेज पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीबद्दल बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य उमेदवाराला किती मत पडली हे देखील पाहावं लागेल. आगामी काळात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत राहावं, अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचं दिलेलं नाव कोणामुळे अडकलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. भाजपला मदत होईल, अशी भूमिका राजू शेट्टी घेणार नाहीत, असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलं.

भाजपच्या विरोधात लाट

भाजपच्या विरोधात लाट आहे, हे विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन दिसतेय. केंद्राने कोविड परिस्थिती हाताळताना केलेला दुजाभाव, निवडणुकीमुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष केलं, याचा हा परिणाम आहे. गेल्या काही वर्षांत सात राज्य भाजप च्या हातातून गेली आहेत. लाखोंच्या सभा घेतल्या म्हणजे लोक मत देतात असं नाही. सामान्य माणसाला कोणतीही मदत केली नाही याची चपराक भाजपला बसली आहे. इथून पुढे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या बाजूने कौल राहील याची मला खात्री आहे, असं देखील पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांवर टीका

चंद्रकांत पाटलांच्या घोषणा गांभीर्याने घेण्यात अर्थ नाही. त्यांचा अभ्यास कितीपत असतो यावर शंका आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या

Pandharpur Election Result 2021 Live | हा विजय जनतेचा, लोकांची ताकद पाठीशी : समाधान आवताडे

Belgaum Election Result 2021 LIVE | सतीश जारकीहोळींना पुन्हा मोठी आघाडी, मंगला अंगडी पिछाडीवर

(Satej Patil slams BJP over the result of Pandharpur Mangalvedha by poll result)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.