Belgaum Election Result 2021 LIVE | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे (Belgaum Lok sabha bypoll result )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:37 PM, 2 May 2021
Belgaum Election Result 2021 LIVE | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव
मंगला अंगडी Vs सतीश जारकीहोळी

Belgaum Loksabha Bypoll :  बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल (Belgaum Loksabha Bypoll Results) आज जाहीर झाला. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी (Mangala Angadi), तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळालं. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मैदानात उतरलेले 26 वर्षांचे शुभम शेळके (Shubham Shelke) निष्प्रभ ठरले आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली होती, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज बेळगावात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात होते. परंतु अनपेक्षितपणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगत निवडणुकीत आली. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Congress vs Shiv Sena Suresh Angadi wife Mangala Angadi vs Satish Jarkiholi vs Shubham Shelke)

कुणाला किती मते?

बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. मंगला यांना 440327 मते मिळाली. तर या निवडणुकीत काँग्रेस हा दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 117174 मते मिळाली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2021 18:37 PM (IST)

    भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी 5240 मतांनी विजयी

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा 5240 मतांनी विजय झाला आहे.

    कुणाला किती मते?

    मंगला अंगडी : 440327

    सतीश जारकीहोळी : 435087

    शुभम शेळके : 117174

  • 02 May 2021 17:59 PM (IST)

    मतमोजनीच्या 87 व्या फेरीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगाला 2903 मतांनी आघाडीवर

    मतमोजनीच्या 87 व्या राऊंडमध्ये कुणाला किती मते ?

    काँग्रेसचे सतीश जारकीहोळी :432299

    भाजपच्या मंगला अंगडी : 435202

    शुभम शेळके : 124642

  • 02 May 2021 17:56 PM (IST)

    भाजपच्या मंगला अंगाला 4123 आघाडीवर मतांनी

    मतमोजनीच्या 86 व्या राऊंडमध्ये कुणाला किती मते ?

    काँग्रेस;s सतीश जारकीहोळी :422389

    भाजपच्या मंगला अंगडी : 426502

    महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके : 124463

  • 02 May 2021 17:53 PM (IST)

    मतमोजनीचा 85 वा राऊंड, भाजपच्या मंगला अंगाला 3967 मतांनी आघाडीवर

    काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी : 420849 मते

    भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी : 424816 मते

    महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 124493 मते

     

  • 02 May 2021 17:13 PM (IST)

    मतमोजनीचा 79 वा राऊंड, काँग्रेसचे सतीश जारकेहोळी 4944 मतांनी आघाडीवर

    काँग्रेस सतीश जारकीहोळी : :408894 मते

    भाजपच्या मंगला अंगडी : 407266 मते

    महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 124233 मते

  • 02 May 2021 17:12 PM (IST)

    मतमोजनीचा 75 वा राऊंड, काँग्रेसचे सतीश जारकेहोळी 4944 मतांनी आघाडीवर

    काँग्रेस सतीश जारकीहोळी : 405814 मते

    भाजपच्या मंगला अंगडी : 400870 मते

    महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके : 122694 मते

     

  • 02 May 2021 16:49 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : सतीश जारकीहोळी यांना पुन्हा नऊ हजारांची आघाडी

    सतीश जारकीहोळी आणि मंगला अंगडी यांच्यात कांटे की टक्कर दिवस अखेरपर्यंत सुरुच आहे. सतीश जारकीहोळी यांना पुन्हा नऊ हजारांची आघाडी घेतली आहे

    सतीश जारकीहोळी : 394549
    मंगला अंगडी : 385685
    शुभम शेळके : 108913

  • 02 May 2021 16:11 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : सतीश जारकेहोळी 4014 मतांनी आघाडीवर

    सतीश जारकीहोळी : 364832
    मंगला अंगडी : 360818
    शुभम शेळके : 108913

  • 02 May 2021 15:16 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : जारकीहोळी 8976 मतांनी आघाडीवर

    59 राऊंडनंतर सतीश जारकीहोळी 8976 मतांनी आघाडीवर

    सतीश जारकीहोळी : 314901
    मंगला अंगडी : 305925
    शुभम शेळके : 90595

  • 02 May 2021 15:00 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : सतीश जारकीहोळींना 10 हजारांहून जास्त मताधिक्य

    सतीश जारकीहोळी : 289107
    मंगला अंगडी : 279859
    शुभम शेळके : 86894

     

  • 02 May 2021 14:24 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : सतीश जारकीहोळींना 9848 मतांची आघाडी

    काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळींना 9848 मतांची आघाडी मिळाली आहे. काही काळ पिछाडीवर राहिलेल्या जारकीहोळींनी पुन्हा मोठी लीड घेतली आहे

    सतीश जारकीहोळी : 261333
    मंगला अंगडी : 251887
    शुभम शेळके : 85553

  • 02 May 2021 13:48 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : सतीश जारकीहोळींना पुन्हा आघाडी, अंगडी पिछाडीवर

    47 व्या राऊंड अखेरीस सतीश जारकीहोळींनी पुन्हा आघाडी घेतली आहे, तर भाजपच्या मंगला अंगडी 9896 मतांनी पिछाडीवर आहेत

    सतीश जारकीहोळी : 247062
    मंगला अंगडी : 237116
    शुभम शेळके : 81771

  • 02 May 2021 13:40 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : अंगडी-जारकीहोळींत केवळ दोन हजार मतांचा फरक

    मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी आघाडी कमी-कमी होत चालली आहे, अंगडी-जारकीहोळींत केवळ दोन हजार मतांचा फरक राहिला आहे

    सतीश जारकीहोळी : 190522
    मंगला अंगडी : 192260
    शुभम शेळके : 45721

  • 02 May 2021 12:40 PM (IST)

    मंगला अंगडींचे मताधिक्य घटते, सतीश जारकीहोळी पुन्हा आघाडी घेण्याची शक्यता

    मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी आघाडी कमी होत आहे, अंगडी-जारकीहोळींत केवळ पाच हजारांचा फरक राहिला आहे

    सतीश जारकीहोळी : 182210
    मंगला अंगडी : 187919
    शुभम शेळके : 45721

  • 02 May 2021 12:05 PM (IST)

    Belgaum Bypoll Result : मोठी लीड तुटली, अंगडी-जारकीहोळींत पुन्हा 9 हजारांचा फरक

    मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी लीड तुटली, अंगडी-जारकीहोळींत पुन्हा 9 हजारांचा फरक राहिला आहे

    सतीश जारकीहोळी : 167054
    मंगला अंगडी : 176512
    शुभम शेळके : 45721

  • 02 May 2021 11:39 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : मंगला अंगडींना मोठी लीड, 13 हजारांच्या मताधिक्यासह विजयी कूच

    मंगला अंगडी जवळपास 13 हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत

    सतीश जारकीहोळी : 138194
    मंगला अंगडी : 151472
    शुभम शेळके : 39992

  • 02 May 2021 10:58 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : मंगला अंगडींना दहा हजारांहून जास्त मताधिक्य

    मंगला अंगडी जवळपास दहा हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत

    सतीश जारकीहोळी : 105722
    मंगला अंगडी : 116295
    शुभम शेळके : 29310

  • 02 May 2021 10:36 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : भाजपच्या मंगला अंगडींना सहा हजारांहून अधिक लीड

    मंगला अंगडी जवळपास सहा हजार मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत

    सतीश जारकीहोळी : 86696
    मंगला अंगडी : 92776
    शुभम शेळके : 23524

  • 02 May 2021 10:15 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : मंगला अंगडी 3380 मतांनी आघाडीवर

    मंगला अंगडी 3380 मतांनी आघाडीवर, बेळगाव पोटनिवडणुकीत चुरस वाढली

    सतीश जारकीहोळी : 67493
    मंगला अंगडी : 70873
    शुभम शेळके : 19289

  • 02 May 2021 10:01 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : अंगडी-जारकीहोळी यांच्यात कांटे की टक्कर, शेळके पिछाडीवर

    काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी झुंज, महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट

    मंगला अंगडी : 59591

    सतीश जारकीहोळी : 56971

    शुभम शेळके : 17673

  • 02 May 2021 09:55 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : मंगला अंगडी 3611 मतांनी आघाडीवर

    भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यात कांटे की टक्कर, अंगडी 3611 मतांनी आघाडीवर

    सतीश जारकीहोळी : 50309
    मंगला अंगडी : 53920
    शुभम शेळके : 16568

  • 02 May 2021 09:41 AM (IST)

    Belgaum Bypoll Result : मंगला अंगडी 2260 मतांनी आघाडीवर

    सतीश जारकीहोळी यांची लीड तोडत मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली

    सतीश जारकीहोळी : 39106
    मंगला अंगडी : 41426
    शुभम शेळके : 13560

  • 02 May 2021 09:18 AM (IST)

    Belgaum by Polls Result : सहाव्या फेरीनंतरही जारकीहोळींची लीड कायम

    सहाव्या फेरीनंतरही काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांची लीड कायम, मंगला अंगडी दुसऱ्या स्थानावर

    सतीश जारकीहोळी : 18004
    मंगला अंगडी : 14418
    शुभम शेळके : 6132

  • 02 May 2021 09:00 AM (IST)

    Belgaum by Polls Result: बेळगावमधून काँग्रेससाठी चांगली बातमी, सतिश जारकीहोळी आघाडीवर

    बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सतिश जारकीहोळी आघाडीवर आहेत. त्यांना 9613 मतं मिळाली आहेत. तर मंगला अंगडी यांना 6445 तर शुभम शेळके यांना 1759 मतं मिळाली आहेत.

  • 02 May 2021 08:54 AM (IST)

    पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे

    बेळगाव पोटनिवडणुकांचे पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे

    काँग्रेस – सतीश जारकीहोळी : 9816
    भाजप – मंगला अंगडी : 6777
    महाराष्ट्र एकीकरण समिती – शुभम शेळके : 3122