AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनडीएची दुसऱ्यांदा बैठक, नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार, भाजपमध्ये अंतर्गत नाराजी?

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी एनडीएची दुसऱ्यांदा बैठक होत आहे.

एनडीएची दुसऱ्यांदा बैठक, नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार, भाजपमध्ये अंतर्गत नाराजी?
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Nov 15, 2020 | 9:23 AM
Share

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी एनडीएची दुसऱ्यांदा बैठक होत आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांचीच बिहारच्या मुख्यमंत्रिपदी निवड होणार असल्याने विधिमंडळ पक्षनेता म्हणून नितीश कुमार यांच्या नावाच्या घोषणेची आजच्या बैठकीच्या माध्यमातून औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. (Second NDA meeting Nitish Kumar will to be elected as Legislative Party leader)

नितीश कुमार आजच राज्यपालांची भेट घेऊन समर्थक आमदारांचं पत्र राज्यपालांना देण्याचीही शक्यता आहे. तसंच राज्यपालही नितीश कुमार यांना सोमवारी शपथविधीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. जेडीयू आणि भाजपकडून सरकार स्थापनेची सगळी तयारी पूर्ण झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी क्रमांक एकचा पक्ष ठरला. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचाराला लोकांनी जोरदार प्रतिसाद देत आरजेडीचे 75 जागांवर उमेदवार विजयी झाले. असं असलं तरी भाजप आणि जेडीयूची निवडणूकपूर्वी युती असल्याने राज्यपालांच्या निमंत्रणानुसार सत्तास्थापनेचा दावा युती म्हणून जेडीयू-भाजप करणार आहेत.

भाजपला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने टाकलेले सर्व डावपेच यशस्वी झाले. एक्झिट पोलमध्ये महागठबंधनची सरशी होणार, असं चित्र दाखवलं गेलं मात्र निकालानंतर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. नितीश कुमार यांचे 43 आमदार निवडून आले आहेत तर भाजपचे 74 उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या तुलनेत नितीश कुमार यांच्या जेडीयूचे आमदार खूपच कमी आहे. अशाही परिस्थितीत नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याने भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी जरी विराजमान झाले तरी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेडीयूच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. भाजपचे जास्त आमदार असून देखील जेडीयूला मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याने अगोदरच पक्षात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत काही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार असल्याचे आडाखे काही राजकीय निरीक्षक बांधताना दिसत आहेत.

सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत गटनेता म्हणून नितीशकुमार यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, रविवारी (आज) त्यांचा नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. याविषयी विचारले असता, “रविवारी दुपारी साडे बारा वाजता एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होईल. या बैठकीत बाकीचे सर्व निर्णय घेतले जातील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी काही औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. मंत्रिमंडळासाठी शिफारशीही राज्यापालांना पाठवल्या जातील. राज्यपालांनी या शिफारशी मान्य केल्यानंतरच नवं सरकार स्थापन करण्यावर विचार केला जाईल.” असं नितीश कुमार म्हणाले.

(Second NDA meeting Nitish Kumar will to be elected as Legislative Party leader)

संबंधित बातम्या

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग

बिहारचे मुख्यमंत्री होणार का?; नितीशकुमार म्हणतात…

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.