बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 7:26 PM

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. (Political movements increased in bihar meetings session started for forming government)

बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप, जनता दल यूनायटेड, हिंदुस्तान आवाम पार्टी आणि विकासशील इन्सान पार्टी या चारही पक्षांची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत एनडीएच्या गटनेत्याची निवड केली जाणार असून त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापण्याचा दावा केला जाणार आहे.

सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत गटनेता म्हणून नितीशकुमार यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, रविवारी त्यांचा नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे.

याविषयी विचारले असता “रविवारी दुपारी साडे बारा वाजता एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होईल. या बैठकीत बाकीचे सर्व निर्णय घेतले जातील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी काही औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. मंत्रिमंडळासाठी शिफारशीही राज्यापालांना पाठवल्या जातील. राज्यपालांनी या शिफारशी मान्य केल्यानंतरच नवं सरकार स्थापन करण्यावर विचार केला जाईल.” असं नितीश कुमार म्हणाले.

संबंधित बातम्या :

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

(Political movements increased in bihar meetings session started for forming government)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.