काँग्रेसचे 51 तर भाजपच्या 49 टक्के उमेदवारांवर गंभीर खटले, करोडपतींचीही कमी नाही

तेलंगणा निवडणुकीतील 2290 उमेदवारांपैकी 23 टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी गुन्हे दाखल असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. या अहवालामधून करोडपती उमेदवारांची माहितीही देण्यात आली आहे.

काँग्रेसचे 51 तर भाजपच्या 49 टक्के उमेदवारांवर गंभीर खटले, करोडपतींचीही कमी नाही
Telangana Assembly Election 2023  Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 11:40 PM

Assembly elections 2023 : तेलंगणा विधानसभेच्या 119 विधानसभा जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाच राज्यांपैकी सर्स्रवात शेवटी मतदान होणारे हे राज्य आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. सभा, मोर्चे, प्रचारसभा यामुळे तेलंगणामधील वातावरण ढवळून निघाले आहे. 3 डिसेबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयाचे दावे करत आहेत. तेलंगणा 119 विधानसभा जागांसाठी एकूण 2290 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि तेलंगणा इलेक्शन वॉचचा अहवाल समोर आला आहे.

तेलंगणा निवडणुकीतील 2290 उमेदवारांपैकी 23 टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी गुन्हे दाखल असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. या अहवालामधून करोडपती उमेदवारांची माहितीही देण्यात आली आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार

ADR च्या अहवालानुसार काँग्रेसच्या 72 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यातील 51 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 71 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 49 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे 24 टक्के उमेदवार गुन्हेगारी प्रकरणात अडकले आहेत. त्याचप्रमाणे 14 टक्के अपक्ष उमेदवारांवरही गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री यांच्या पक्षात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात करोडपती उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे. 2290 उमेदवारांपैकी 25 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे 96 टक्के उमेदवार आहेत. काँग्रेसचे 94 टक्के, एमआयएमचे 89 टक्के आणि भाजपचे 84 टक्के उमेदवार करोडपती आहेत. तसेच, 41.48 टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती 10 लाख रुपयांपेक्षा कमी दाखविली आहे.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.