Sharad Pawar : ‘संभाजीराजेंना भाजपनं चांगली वागणूक दिली नाही’, शरद पवारांचा गंभीर आरोप; तर राजेंच्या निर्णयाचं स्वागत

Sharad Pawar : 'संभाजीराजेंना भाजपनं चांगली वागणूक दिली नाही', शरद पवारांचा गंभीर आरोप; तर राजेंच्या निर्णयाचं स्वागत
शरद पवार, संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: TV9

आज शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

दिनेश दुखंडे

| Edited By: सागर जोशी

May 18, 2022 | 7:22 PM

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात संख्याबळ पाहता भाजपचे 2, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा देण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी केलंय. संभाजीराजे यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. तर शिवसेनेकडून मात्र दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

‘भाजपने संभाजीराजेंना मराठा आरक्षणावर बोलायला संधी दिली नव्हती’

शरद पवार म्हणाले की, भाजपने त्यांना मराठा आरक्षणावर बोलायला संधी दिली नव्हती. राजे हे एका समाजाचे नेते नसतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करायला हवं. पण भाजपने त्यांना चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेलाही शरद पवार यांनी उत्तर दिलंय. काही लोक बातमी होण्यासाठी स्टेटमेंट करतात. जर कुणी लोकांच्या संस्कृतीच्या विरोधात बोलले तर त्याला आम्ही विरोध करणार, असं शरद पवार म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी पवारांनी संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. त्यांचे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र शिकला तर माती होईल, अशी जोरदार टीका केली होती.

राज्यसभेसाठी शिवसेनेची संभाजीराजे छत्रपतींसमोर अट?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं. त्यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देण्यात येतील, असं जाहीर केलं. तर शिवसेनेकडून मात्र सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी शिवसेनेनं संभाजीराजेंना राज्यसभेसाठी एक ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें