अभ्यासक्रमात 'शरद कमळ बघ, छगन कमळ बघ', शरद पवार म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारला शालेय अभ्यासक्रमात 'शरद कमळ बघ, छगन कमळ बघ' असं वाक्यं टाकल्याबद्दल टोले लगावले आहेत.

Sharad Pawar on Teachers problem, अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’, शरद पवार म्हणतात…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारला शालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’ असं वाक्यं टाकल्याबद्दल चांगलेच टोले लगावले आहेत (Sharad Pawar on Teachers problem). तसेच फडणवीस सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते मुंबईत विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या अधिवेशनात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचे आहे की माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी 7 दिवसांचा असताना मी आईच्या काखोटीतून स्कुल बोर्डाच्या मिटींगला गेलोय. त्यामुळे मला कमळ कसं दिसेल?”

“संजय राऊतांना असं रोज कसं सुचतं हा प्रश्न, आता उत्तर मिळालं”

शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे खासदार आणि संसदीय नेते संजय राऊत यांनाही अनेक मिश्किल टोले लगावले. संजय राऊत यांना दररोज सामनात चिमटे काढायला, टोले लगावायला आणि फटकारे मारायला कसं सुचतं असा प्रश्न होता. मात्र, आता त्यांचं उत्तर मिळाल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “अलिकडे आम्ही सर्व एकत्र काम करतो. मात्र, ज्या काळात आम्ही एकत्र काम करत नव्हतो तेव्हा मी रोज सकाळी सामना वाचत असे. आज काय फटकारे लगावले, आज काय टोले लगावले, आज काय चिमटा काढलाय हे पाहण्यासाठी मी सामना वाचायचो. त्यावेळी वाटायचं की यांना असं रोज कसं सुचतं? ते आत्ता कळलं की त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत त्यामुळे त्या रोज जाब विचारतात. चुकीच्या रस्त्यावर गेल्यावर योग्य रस्त्यावर आणण्याचं कर्तुत्व शिक्षक किंवा शिक्षिका दाखवते. हे यांना घरापासून दिसत आलंय.”

“महाराष्ट्रात 13 हजार शाळा बंद करणे हा उध्वस्त करणारा निर्णय”

दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांना शिक्षकांच्या प्रश्नासाठी वेळ देण्याचं आवाहन केलं. यावर शरद पवार यांनी देखील ते मान्य करत आमदार कपिल पाटील, संजय राऊत यांच्यासोबत बसून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. मागील सरकारच्या काळात 5 वर्षात कुठल्याही मंत्र्याच्या घरी गेलो नव्हतो. फक्त शिक्षण मंत्रांच्या घरी गेलो होतो. कारण पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न महत्वाचा वाटतो. पण तरीही त्या सरकारला काही फरक पडला नाही, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मागील सरकारने काळजी घेतली नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या दिसत आहेत. महाराष्ट्रात 13 हजार शाळा बंद होतात. इतका उध्वस्त करणारा चुकीचा निर्णय आजपर्यंत कुणी घेतला नव्हता. या प्रश्नावर मी, संजय राऊत आणि कपिल पाटील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बसतो. अगदी सर्वात प्राधान्यक्रमाचे शिक्षकांचे 5 प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आणि शिक्षण मंत्र्यांसमोर मांडतो.”

संबंधित बातम्या :


Sharad Pawar on Teachers problem

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *