शेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन

शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

शेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 7:39 PM

मुंबई : कृषी विषयक विधेयकांचा विरोध करत एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पवारांनी बादल कुटुंबाचे आभार मानले. (Sharad Pawar congratulates Akali Dal for pulling out of NDA in protest to Farmers’ Bills)

‘कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!’ असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याआधीच अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अकाली दलाच्या पवित्र्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

“मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याची हमी न दिल्याने शिरोमणी अकाली दल (SAD) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत आहे. केंद्र सरकारची पंजाबी आणि शिखांच्या मुद्द्यावरही असंवेदनशीलता सुरु आहे.” असे कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अकाली दलाने म्हटले. (Sharad Pawar congratulates Akali Dal for pulling out of NDA in protest to Farmers’ Bills)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषीविषयक तीन विधेयकांना मंजुरी दिली आहे. याबाबचे राजपत्र आज प्रकाशित झाले आहे. राष्ट्रपतींनी विधेयकांना मंजुरी दिल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना राष्ट्रपतींनी 24 सप्टेंबरला मंजुरी दिल्याचे राजपत्रात म्हटले आहे.

हीच ती बहुचर्चित विधेयकं

  1. शेतकऱ्यांचं उत्पन्न, व्यापार आणि किसानों के उत्पाद, व्यापार आणि व्यवसाय संवर्धन सेवा विधेयक
  2. हमीभाव आणि कृषी सेवा विधेयक आणि शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण विधेयक
  3. आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक

संबंधित बातम्या :

कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधानंतरही रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात

(Sharad Pawar congratulates Akali Dal for pulling out of NDA in protest to Farmers’ Bills)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.