AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी’, पवारांचा विखेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत.

'देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी', पवारांचा विखेंना टोला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 28, 2021 | 1:46 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत. “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे ही आहेत. पण नावं घेताना काहींना अॅलर्जी होते,” असा टोला पवारांनी लगावला. विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय कायमच पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. मात्र, इतर नावांचा उल्लेख होत नाही, असाच पवारांचा हे बोलण्यामागील रोख असल्याचं बोललं जातंय (Sharad Pawar criticize Vikhe Family over credit of First Cooperative Sugar Factory in India).

शरद पवार म्हणाले, “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचाच आहे. हा कारखाना उभा करण्यात पहिले दोन नावं म्हणजे धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे यांची आहेत. पण ही नाव घेताना अनेकांना अॅलर्जी होते.”

“देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड योगदान देणाऱ्या आणि सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संबंध वर्षांत विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत. या संकल्पनेची आम्ही आज सुरुवात करत आहोत. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं,” असंही पवारांनी सांगितलं.

‘देशामध्ये हरितक्रांती आणण्यात अण्णासाहेब शिंदेंचा महत्त्वाचा वाटा’

शरद पवार म्हणाले, “देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रहमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती.”

“आज शेतकऱ्यांना थंडीत 60 दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो,” असं म्हणत पवारांनी मोदी सरकारला टोला लगावला.

हेही वाचा :

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar criticize Vikhe Family over credit of First Cooperative Sugar Factory in India

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक