AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : जनता आज ना उद्या ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना इशारा

आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई (Mumbai) येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं आवाहन केलं.

Sharad Pawar : जनता आज ना उद्या ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना इशारा
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jul 12, 2022 | 6:23 PM
Share

मुंबई : ‘सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता (People) बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला दिलाय. आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई (Mumbai) येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं आवाहन केलं.

‘सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ’

संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र हल्ली केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा कॉंग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे असेही शरद पवार म्हणाले. यावेळी आणीबाणीची आठवण शरद पवार यांनी सांगितली आणि त्यात 1977 मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते, असंही पवार म्हणाले.

‘शिवसैनिक नाराज,राज्यात आगामी काळात वेगळं चित्र दिसणार’

आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाददुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल, असा दावाही पवार यांनी केलाय.

पाऊस कमी झाल्यावर आपल्याला जोमाने अडीच वर्षे काम करायचं आहे. लोकांशी संपर्क करायचा आहे, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ही आंदोलने सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून करावी आणि त्यामूळे आपल्या पक्षाला वेगळे भवितव्य पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केलाय.

‘मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो’

पक्ष संघटना म्हणून आपल्याला कष्ट करायचा हा कालखंड आहे. पक्षाची स्थापना 1999 ला केली. आजपर्यंत पक्षाचा 23 वर्षाचा कालखंड झाला. यामध्ये साडेसतरा वर्षे सत्तेत आपण होतो. यामध्ये भाजपकडे किती वर्ष होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सोडला तर जास्त काळ भाजप सत्तेत नव्हता. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत. त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो. सत्ता असताना अधिकार्‍यांची एक साखळी लक्षात येते. मात्र विरोधात असताना एखादा निर्णय घेतला असेन तर तो आपल्याला जाता येताना पहाता येतो, असंही पवार यावेळी म्हणाले.

‘आता निवडणूका पुढे जाण्याची शक्यता’

ओबीसी आरक्षणाच्याबाबत आज कोर्टाने निकाल दिला आहे. निवडणूकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत तिथे निवडणूका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणूका झाल्या पाहिजेत ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे. आणि त्यातून नगरपालिका, नगरपरिषद या सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिल, असा दावाही पवारांनी केला.

आगामी नगरपरिषद, नगरपालिका निवडणूकात नेतृत्वाची फळी तयार करण्याची व सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. यावेळी 50 टक्के नवीन तरुण पिढी घ्या, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा, हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

‘राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही’

आगामी निवडणूका कशा लढणार आहोत याचा निर्णय पक्ष नक्की घेईल. पक्षाने निर्णय घेतला की तिकडे सगळं लक्ष केंद्रीत करावं लागेल. आपले 54 आमदार आणि शिवसेनेचे 56 तर कॉंग्रेसचे 44 अशी परिस्थिती होती. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करुया. पक्षाची लाईन घेऊन काम करा. कामाची जबाबदारी विकेंद्रीकरणाप्रमाणे करुया. प्रत्येक जिल्ह्यात काय काम करायचं याची माहितीही यावेळी शरद पवार यांनी दिली. इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली परंतु राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली