AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंनी कारण नसताना माझं नाव का घेतलं?; शरद पवार यांचा खोचक सवाल

"शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका", असेही राज ठाकरे म्हणाले. यानतंर आता शरद पवारांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंनी कारण नसताना माझं नाव का घेतलं?; शरद पवार यांचा खोचक सवाल
| Edited By: | Updated on: Aug 12, 2024 | 1:10 PM
Share

Sharad Pawar On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करताय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका”, असेही राज ठाकरे म्हणाले. यानतंर आता शरद पवारांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

“राज ठाकरे यांनी दोन तीनदा माझं नाव का घेतलं. मला कळलं नाही. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही. आग्रह केला नाही. करणार नाही. मणिपूरबाबतचा प्रश्न वेगळा होता. हातभर लावण्याचा काम करतोय की आता जे बोललो ते सोडवण्याचं काम करतोय. त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं. मीही मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं. मला निवेदन दिलं. हे पवारच करतात का?” असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ… माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती मणिपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केले.

Follow Us
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?
रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
Raigad Heavy Rain | रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय
ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! थेट दिल्ली संसदेतील पक्षाचं कार्यालय जाणार? मोठी अपडेट समोर