पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर पवार का म्हणाले, त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत? प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

सावरगावमधील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्लाच आपल्या सहकाऱ्यांना दिला. त्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर पवार का म्हणाले, त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत? प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडे, शरद पवार
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 8:27 PM

मुंबई : ठाकरे सरकार आपल्या ओझ्यानंच पडेल असा दावा अनेक भाजप नेते करत असतात. या नेत्यांना माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे. सावरगावमधील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्लाच आपल्या सहकाऱ्यांना दिला. त्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar’s reaction to Pankaja Munde’s statement about the Mahavikas Aghadi government)

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवार यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी भाजप सांगतं की महाविकास आघाडी सरकार पडेल. पण पंकजा मुंडे यांनी हे राजकारण बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षमपणे राबवावी असं भाष्य केलं. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी भाजप नेत्यांना दिला.

आयकर विभागाच्या कारवाईवरुन पवारांचा केंद्रावर निशाणा

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. पाच दिवस या धाडी चालल्या. त्यानंतर तिथे जाऊन मी चौकशी केली. अधिकाऱ्यांनी मागितलेली कागदपत्रं पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्यांचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच-पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय.

इतर बातम्या :

‘अर्धेच काय संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही’, मलिकांचं फडणवीसांना आव्हान

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे बडे नेते कामाला, कोण कुणावर भारी ठरणार?

Sharad Pawar’s reaction to Pankaja Munde’s statement about the Mahavikas Aghadi government

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.