मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पोटनिवडणूक लढणार, बाबुल सुप्रियोंना मोठी जबाबदारी?

पश्चिम बंगालमध्ये 12 एप्रिलला पोटनिडवणूक होत आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामद्ये आज एक मोठा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा चेहरा घोषित करण्यात आलंय, अशी घोषण खुद्द तृणमूलच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पोटनिवडणूक लढणार, बाबुल सुप्रियोंना मोठी जबाबदारी?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मोठी घोषणा केली आहे. प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोल मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणार आहेत.
Image Credit source: social
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 13, 2022 | 1:40 PM

पश्चिम बंगालमध्ये (West bangal) 12 एप्रिलला पोटनिडवणूक होत आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामद्ये आज एक मोठा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांना आसनसोल मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा चेहरा घोषित करण्यात आलंय, अशी घोषण खुद्द तृणमूलच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तर बालीगंज विधानसभा जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूलनं बाबुल सुप्रियो यांना तृणमूलचा चेहरा बनवलाय. बाबुल सुप्रियो हे आसनसोल मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे आसनसोलच्या याच जागेवर आता प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढतील.

शत्रुघ्न सिन्हांचा राजकीय प्रवास

शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेसच्या तिकिटावरुन पाटणा साहिब मतदारसंघात 2019मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. 2009 आणि 2014 मध्ये सिन्हा हे भाजपकडून याच मतदारसंघात लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी भापज सोडलं. भाजप हा ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ बनला आहे, अशी टीका सिन्हा यांनी केली होती. सिन्हा यांनी 80 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात सिन्हा यांनी अनेक वर्ष स्टार प्रचारकाचं काम केलं. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिन्हा यांनी प्रवेश केलेला तृणमूल काँग्रेस हा तिसरा पक्ष आहे.

बाबुल सुप्रियोंना मोठी जबाबदारी?

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या आसनसोल या लोकसभा जागेचाही समावेश आहे. ही लोकसभेची जागा बाबुल सुप्रियो यांच्यामुळे खाली झाली आहे. मागच्या वर्षी बाबुल सप्रियो यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम करुन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता असं म्हटलं जातंय की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाबुल सुप्रियो यांना विधानसभेत मोठी जबाबदारी देऊ शकतात.

 

इतर बातम्या

VIDEO: फडणवीसांचा जबाब नोंदवणे सुरू, पोलीस पथक येण्यापूर्वी बंद दाराआड भाजप नेत्यांशी अर्धा तास खलबतं?; चर्चा नेमकी कशावर?

VIDEO : मी मास्क घालत असून मला दोन वेळा कोरोना झाला : Ajit Pawar

आज अमृतसरमध्ये ‘आप’चा भव्य रोड शो; अरविंद केजरीवाल, भगवंत मान होणार सहभागी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें