AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हो! लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले, आमचे सरकार… शिंदे गटाच्या मंत्र्याची जाहीर कबुली

तुमच्याकडे सत्ता असताना त्यावेळी तुम्ही का नाही ही योजना काढली? विरोधक बोलत आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय काढले. पण, जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही का असे निर्णय का घेतले नाहीत?

हो! लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले, आमचे सरकार... शिंदे गटाच्या मंत्र्याची जाहीर कबुली
shambhuraj desaiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 14, 2024 | 8:40 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून दररोज काही न काही बातमी चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेवरून विरोधी पक्षांनी सत्ताधरी पक्षावर टीका केली आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्यसरकारने मोठे कर्ज काढल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावरून शिंदे गटाचे मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर कबुली दिली. आता विरोधक बोलतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले. हो! आम्ही कर्ज काढू. पण, आमचे सरकारच ते कर्ज फेडणार आहोत असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई येथे पाटण विधानसभा रहिवाशांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाटण विधानसभा अंतर्गत लोकांची, नागरिकांची विचारपूस करण्यासाठी आलोय ते यावेळी म्हणाले. 1995 साली खूप साखर कारखाने बंद झाले. तेव्हा सत्तेत कोण होते? भूकंप झाला त्यावेळी आमच्याकडे दाखले नव्हते. मी आमदार झालो तेव्हा भूकंप दाखल्याचा प्रश्न मांडला. आता मुख्यमंत्री यांना सांगितले सरसकट भूकंप दाखले दया. आम्ही आग्रह धरला त्यामुळे कामे होत आहेत. आपल्या सरकारने भरपूर कामे केली आहेत. नाही तर मंत्री म्हणून कोट घालून नुसते फिरावे लागले असते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठकारे यांचे नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उठाव केला. आम्ही आमदारांनी पण उठाव केला. आम्ही शिंदे साहेबांना बोललो आपण काहीतरी निर्णय घ्या. भाजपसोबत चला असे आम्हीच त्यांना सांगितले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको. बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. दिल्लीवाले यांचा शब्द होता की मुख्यमंत्री शिंदे यांनाच करणार. गेल्या अडीच वर्षांतील कामे बघा. पावणे तीनशे योजना पाटण मतदारसंघात आहेत. याआधी काही होते का? अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यासाठी शरद पवारांनी विरोधी पक्षांना फोन केला होता. त्यामुळे सह्याद्रीवरील बैठकीला ते अनुपस्थितीत राहिले. मात्र, आम्ही सर्वांना बोलावले होते. पण, विरोधी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अनुपस्थित राहिले. छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत आधी काम केले आहे त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहित आहेत. आपल्या सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे ते कोर्टातदेखील टिकेल. आमचे सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळे आम्ही सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. मात्र, विरोधी पक्षनेते गैरहजर राहिले असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधक बोलतात की सरकारने कर्ज काढले. हो! आम्ही कर्ज काढू. पण, ते कर्ज आम्ही सरकारच फेडणार आहोत. तुमच्याकडे सत्ता असताना त्यावेळी तुम्ही का नाही ही योजना काढली? विरोधक बोलत आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय काढले. पण, जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही का असे निर्णय का घेतले नाहीत असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

मोदी साहेबांनी शपथ घेऊन सांगितलं सविधान नाही बदलणार. मुख्यमंत्री शिंदे यांनीही संविधान बदलणार नाही हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना 2 महिने सुट्टी दया असे म्हणालो आहे. कारण, मला आता मतदारसंघात काम करायचे आहे. नाही तर नंतर बोलाल की मतदारसंघात लीड का मिळाला नाही. येथे विजयी झाल्यानंतर आपण पुन्हा मोठा हॉल घेऊन जंगी कार्यक्रम करू असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.