उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली!

"भाजपकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेचे 18 खासदार आहेत. राम मंदिर उभारणीसाठी आणखी काय हवंय?"

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली!
Follow us
| Updated on: Jun 07, 2019 | 1:19 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. येत्या 16 जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याची अधिकृत माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत आणि श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांसह अयोध्येत गेले होते. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणाही याआधी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, भाजपशी युती झाली आणि उद्धव ठाकरे घोषणा विसरुन, निवडणुकीच्या कामाला लागले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागीही झाली.

लोकसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवस्थांनांचं दर्शन घेण्यास सुरुवात केली. सर्वात आधी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन ठाकरे कुटुंबीयांचं कुलदैवत अससेल्या कार्ल्याच्या एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते, त्यानंतर कोल्हापुरात जाऊन करवीर निवासिनी अंबाबाईचंही उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांसोबत दर्शन घेतलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहे.

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी कालच ट्वीट करुन राम मंदिर उभारणीबाबत आपली भूमिका व्यक्त केली होती. “भाजपकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेचे 18 खासदार आहेत. राम मंदिर उभारणीसाठी आणखी काय हवंय?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांनाच उद्देशून विचारला होता.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जूनला अयोध्येत जाऊन काय बोलतात, राम मंदिराबाबत काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.