AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी? अजय चौधरींकडे गटनेतेपद

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल होते. दुपारी विधान परिषदेची निवडणकू पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुजरातच्या दिशेने गेले. पालघर सोडल्यानंतर त्यांना लगेचच गुजरात पोलिसांनी संरक्षण दिलं.

Uddhav Thackeray : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी? अजय चौधरींकडे गटनेतेपद
मोठी बातमी, एकनाथ शिंदेंची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी? अजय चौधरींकडे गटनेतेपदImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2022 | 2:44 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत (shivsena) एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे 11 आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना प्रस्ताव पाठवून दबावाचे राजकारण करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकारून पक्षात कुणीही बंड करू शकणार नाही. कुणाही पुढे पक्ष झुकणार नाही हे दाखवून दिलं आहे. शिंदे यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे ऐवजी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. चौधरी यांची गटनेतपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल होते. दुपारी विधान परिषदेची निवडणकू पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुजरातच्या दिशेने गेले. पालघर सोडल्यानंतर त्यांना लगेचच गुजरात पोलिसांनी संरक्षण दिलं. म्हणजेच निवडणुकीनंतर गुजरातला जाण्याचं शिंदे यांचं आधीच ठरलं होतं. त्याचं प्लानिंगही झालं होतं. त्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये थांबले. तोपर्यंत शिंदे यांनी बंड केल्याचं कुणाला कानोकान खबर नव्हती. मात्र, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांनी जल्लोष केला नाही. शिवसेनेकडून कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आलं नाही. त्यामुळे शिवसेनेत आलबेल नसल्याचं जाणवत होतं.

खैरेंना कुणकुण होती

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना पक्षात फूट पडत असल्याची कुणकुण लागली होती. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलूनही दाखवलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावरही त्यांनी टाकलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीही सावध झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लगेचच सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते.

आदित्य ठाकरेंकडे धुरा?

दरम्यान, शिवसेनेच्या गटनेतपदावरून शिंदे यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही. या आधी गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गटनेतेपदाची ही धुरा देण्यात आली आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...