शिवसेना-भाजप कोण किती जागा लढणार, फॉर्म्युला दहा दिवसात ठरणार!

भाजप-शिवसेना जागावाटपाची बोलणी पुढच्या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाआधी युतीचा फॉर्म्युला ठरण्याची चिन्हं आहेत.

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:38 PM, 2 Sep 2019
शिवसेना-भाजप कोण किती जागा लढणार, फॉर्म्युला दहा दिवसात ठरणार!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजपने  (Shiv Sena BJP )पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांनी (Shiv Sena BJP ) युतीनेच निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता जागावाटपाची चर्चा सुरु होत आहे.

भाजप-शिवसेना जागावाटपाची बोलणी पुढच्या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाआधी युतीचा फॉर्म्युला ठरण्याची चिन्हं आहेत. काही जागांवरुन वाद आहेत, पण वाटाघाटी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं ठरलं आहे. मात्र दोन्ही पक्षात येणारी आवक बघता हा फॉर्म्युला बदलण्याचीच शक्यता आहे.

एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे. परंतु सर्वांना खुश करण्यासाठी तितक्या जागाच नसतील, तर काय करायचं, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युती तोडण्याचा मार्ग काढला जाऊ शकतो.

13 तारखेपासून आचारसंहिता?

विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक कधी जाहीर होणार, याचा अंदाज बांधण्यात भाजप नेत्यांची चढाओढ लागलेली दिसत आहे. येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता (Assembly Election Code of Conduct) लागणार आहे, असं भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर करुन टाकलं. जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात संवाद साधताना दानवेंनी ही माहिती दिली.

संबधित बातम्या  

मित्रपक्षांचा भार आमच्या माथी नको, शिवसेना 144 जागांसाठी आग्रही    

विधानसभेसाठी महायुतीत कोण किती जागा लढणार? चंद्रकांत पाटलांनी संपूर्ण फॉर्म्युलाच सांगितला! 

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी    

शिवसेना आमचा खरा मित्र, त्यांनी आम्हाला वाईट काळातही साथ दिली : अमित शाह