भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्राकडे बोट!, पंडित नेहरुंप्रमाणे काम करण्याचा सल्ला

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून केंद्रावर टीका करण्यात आली आहे. (Shivsena BJP Bhandara hospital)

भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्राकडे बोट!, पंडित नेहरुंप्रमाणे काम करण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 7:10 AM

मुंबई : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत (Bhandara hospital fire) 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे (Shiv sena) मुखपत्र सामनामधून केंद्रावर टीका करण्यात आली आहे. राजकार कमी करुन पंडित नेहरुंच्या ( Pandit Nehru) काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे काम करण्याचा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. “दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा,” असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. (Shiv sena criticises BJP on Bhandara hospital fire suggested to work like Pandit Nehru)

हा तर बेशपमपणाचा कळस

भाजप भंडारा रुग्णालय दुर्घटनेचे राजकीय भंडवल करत असल्याचा आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. “भंडाऱ्यात दहा बालकांचा मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केले. हा बेशरमपणाचा कळस आहे,” असं शिवसेनेने सामना अग्रलेखातून म्हटलंय. तसेच, दहा बालकांचा मृत्यू ही राज्य सरकारची जबाबदारी नक्कीच आहे. मात्र मागची 5 वर्षे सत्तेवर असलेल्यांनाही आपली कातडी वाचविता येणार नसल्याचे म्हणत शिवसेनेने याआधीच्या फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

मृत्यूचे खापर फोडत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करु

दरम्यान, सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजप आणि या आधीचे देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर टीका केली असली तरी सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली आहे. भंडाऱ्यातील दुर्घटनेतील बालकांच्या मृत्यूचे खापर एकमेकांवर फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करुन आरोग्य व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी काय करता येईल यावर विचार व्हावा असं शिवसेनेने सामनाअग्रलेखातून म्हटलंय. तसेच राज्याच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचेच ऑडिट होण्याची गरजही सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलीये.

संबंधित बातम्या :

‘ये पब्लिक सब जाणती है’, राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा : बाळा नांदगावकर

Pankaja Munde | … आणि पंकजा मुंडे हळहळल्या

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला, चंद्रकांत पाटलांची उपरोधिक टीका

(Shiv sena criticises BJP on Bhandara hospital fire suggested to work like Pandit Nehru)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.