AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena Dussehra Melava : ‘या’ कारणासाठी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली!

शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायला मुंबई महापालिकेनं नकार दिला आहे. दसरा मेळावा घेताना परवानगी नाकारत असताना पालिकेनं नेमकं कारण काय दिलं आहे, ते जाणून घ्या...

Shiv Sena Dussehra Melava : 'या' कारणासाठी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली!
मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेचा गुंता कायमImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 22, 2022 | 10:48 AM
Share

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कुणालाच परवानगी न घेण्याची भूमिका आता मुंबई महानगर पालिकेनं (BMC 2022) घेतलीय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याचं पालिकेनं दसरा मेळाव्याची परवानगी नाकारताना म्हटलंय. त्यामुळे कुणालाच परवानही देणार नाही, अशी बचावात्मक भूमिका बीएमसीने घेतलीय. शिवसेना आणि शिंदे गटाची मागणी अखेर बीएमसीने फेटाळून लावली आहे. उपायुक्त परिमंडळ दोन कडून ठाकरे गट आणि शिंदे गट यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रातून परवानगी देण्यात येणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायाचा हवाला या पत्रात देण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन परवानगी नाकारल्यानं पालिकेनं म्हटलंय.

शिवाजी पार्क परिसरात दोन गटात झालेल्या राड्यामुळे शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय शिंदे गटालाही परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचंय.

पालिकेनं परवानगी नाकारता नेमकं काय म्हटलंय?

  • मुंबई पालिकेकडून शिवाजी पार्कातदसरा मेळावा घेण्यासाठी कुणालाही परवानगी नाही
  • दोन्ही गटांमध्ये गणपती विसर्जनावेळी राडा झाला,त्यानंतर प्रभादेवीमध्ये राडा झाला
  • मेळव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते
  • मुंबई पोलिसांच्या अभिप्रायामुळे शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी नाकारली

पाहा व्हिडीओ :

आज हायकोर्टात सुनावणी

शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्येही दोन दिवसांपूर्वी गेलं होतं. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. दरम्यान, बुधवारपर्यंत कोणताही निर्णय न घेण्यात आल्यानं अखेर कायदेशीर मदत घेण्याचं शिवसेनेनं ठरवलं. त्यामुळे शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, यावरुन राजकारण ढवळून निघालंय. त्यातच आता पालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर हायकोर्ट नेमका काय निर्णय देत, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना