AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लालचंद सुधर जा, उनकी बीबी को…’ अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी!

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

'लालचंद सुधर जा, उनकी बीबी को...' अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी!
ABHISHEK GHOSALKAR AND TEJASWI GHOSALKAR
| Edited By: | Updated on: Apr 04, 2025 | 3:54 PM
Share

Abhishek Ghosalkar : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या पत्नीला धमकी आली आहे. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही धमकी देण्यात आली आहे. बोरीवलीतील एमएचबी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता घोसाळकर यांच्या पत्नींना थेट धमकी आली आहे. पोलीस धमकी कोणी दिली? याचा शोध घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली धमकी

मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. गरीब नवाज मियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही धमकी देण्यत आली आहे. या धमकीचा तपास करण्यासाठी एमएचबी कॉलिनी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा नेमका आरोप काय?

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना एका व्हॉट्सअप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून इंग्रजीत ही धमकी देण्यात आली आहे. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, उनकी बीबी को मत मरावा देना’ अशा प्रकारची ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या धमकीची गंभीर दखल घेत बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्यांचा आता शोध घेतला जात आहे.

जीवाला धोका असल्याचा केला होता दावा?

याआधीही गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांनी माझ्या जीवाला धोका आहे, असं म्हटलं होतं. माझ्या जीवाला धोका असूनही माझ्या सुरक्षेकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मला सलमान खानसारखे संरक्षण, सुरक्षा का दिली जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

नेमकी कशी झाली होती हत्या?

अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 मध्य गोळ्या घालून हत्या झाली होती. दहिसरमध्ये मॉरिसभाईच्या कार्यालयात घोसाळकर आणि मॉरिसभाई यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यानंतर मॉरिस भाईने फेसबुक लाईव्ह सुरू असताना बंदुक काढून घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सोबतच मॉरिसभाईनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात या हत्या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल आणि या हत्या प्रकरणाचा छडा लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.