काँग्रेसच्या उमेदवारीसाठी भिवंडीतल्या शिवसेना नेत्याचे दिल्लीत प्रयत्न सुरु

भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता नाराज नेते पुढे यायला लागले आहेत. भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी आता चुरस वाढली आहे. भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेनेकडून उमेदवारीचा दावा करणारे सुरेश म्हात्रे यांनी आता काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरु केल्याचंही बोललं जातंय. भिवंडीत […]

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी भिवंडीतल्या शिवसेना नेत्याचे दिल्लीत प्रयत्न सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता नाराज नेते पुढे यायला लागले आहेत. भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी आता चुरस वाढली आहे. भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेनेकडून उमेदवारीचा दावा करणारे सुरेश म्हात्रे यांनी आता काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरु केल्याचंही बोललं जातंय.

भिवंडीत काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नावावर सहमती होत असताना शेवटच्या क्षणी नवीन समीकरण समोर आलं आहे. सुरेश म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडूनच होईल. शिवाय काँग्रेसला आयात केलेला उमेदवार देणंही सोपं नसेल. कारण, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी यामुळे ओढावण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सुरेश म्हात्रे?

सुरेश म्हात्रे यांनी 2014 ची निवडणूक मनसेकडून लढवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते अपयशी झाल्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून जिल्हा परिषद सत्तेच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा क्षेत्रात त्यांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. 2014 च्या निवडणुकीत कपिल पाटील यांचा विजय झाला होता, तर सुरेश म्हात्रे यांनी 93 हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती. या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता शिवसेनेत तिकीट मिळण्याची आशा मावळल्याने काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो मागील 30 वर्षांपासून अनुसूचित जमातीसाठी राखीव डहाणू लोकसभेचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्याने खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी इथून दणदणीत विजय मिळवला.

शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाड्याकडील ग्रामीण भाग येत असल्याने येथील आगरी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून भाजपाने खेचून घेतला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात दाखल झालेले कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा तब्बल 109450 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. तर मनसेचे सुरेश म्हात्रे हे 93647 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.