… म्हणून मी सभागृहात जाऊन भाजपचा बॅनर फाडला, हाणामारीनंतर शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad vs BJP MLA Abhimanyu Pawar) आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मारामारी झाली.

… म्हणून मी सभागृहात जाऊन भाजपचा बॅनर फाडला, हाणामारीनंतर शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 12:16 PM

नागपूर : विधानसभा सभागृहात आज शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad vs BJP MLA Abhimanyu Pawar) आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मारामारी झाली. चक्क सभागृहात आमदारांची हाणामारी झाल्याने एकच गदारोळ झाला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहात घडलेला प्रकार बाहेर आल्यानंतर माध्यमांसमोर सांगितला. (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad vs BJP MLA Abhimanyu Pawar)

आमदार संजय गायकवाड म्हणाले, “कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ घातला. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. अधिवेशन केवळ पाच दिवसच चालणार आहे. चर्चा करण्यापेक्षा विरोधक वेलमध्ये आले. गृहमंत्री जयंत पाटील हे अध्यक्षांना वारंवार विनंती करुन, सुरक्षा देण्याची मागणी करत होते. मात्र विरोधक मंत्र्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या समोर बॅनर घेऊन घोषणाबाजी करत होते. त्यामुळे आम्ही बॅनर फाडला”

“विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र विरोधकांकडून मंत्र्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न कालही झाला आणि आजही झाला. जयंत पाटील हे सतत अध्यक्षांकडे संरक्षण मागत होते. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन विरोधक गोंधळ घालत होते. त्यामुळेच आम्ही पुढे जाऊन तो बॅनर फाडला. अध्यक्षही सतत तो बॅनर हटवण्यासाठी विनंती करत होते. अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना नावं लिहून घेण्याच्या सूचना दिल्या. तरीही गोंधळ थांबत नव्हता. शेवटी मग मंत्रिमहोदयांना बोललं जात नसल्याने आम्ही गेलो आणि बॅनर फाडला आणि त्यानंतर गोंधळ झाला” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

सभागृहातील प्रकार अशोभनीय : विधानसभा अध्यक्ष

सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

दोन आमदारांची हाणामारी

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.

भाजप आमदारांची बॅनरबाजी

नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडेबाजी (Shiv Sena BJP MLA fight) पाहायला मिळत आहे. भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Shiv Sena BJP MLA fight) मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली. भाजपने सामनातील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली.

सामना हातात घेऊन भाजपचं आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला. भाजपने सामनातील बातमी दाखवत आंदोलन केलं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.