चाळ ते संसद व्हाया रिझर्व्ह बँकेत नोकरी; जाणून घ्या खासदार गजानन किर्तीकरांचा राजकीय प्रवास

गजानन किर्तीकर रिझर्व्ह बँकेत नोकरीला असताना याठिकाणी दाक्षिणात्य मंडळींचे प्राबल्य होते. | Shiv Sena MP Gajanan Kirtikar

चाळ ते संसद व्हाया रिझर्व्ह बँकेत नोकरी; जाणून घ्या खासदार गजानन किर्तीकरांचा राजकीय प्रवास
गजानन किर्तीकर, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 4:15 PM

मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि आजही शिवसेनेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar ) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गजानन किर्तीकर हे सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा पराभव करुन वायव्य मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. 2019 च्या निवडणुकीतही गजानन किर्तीकर यांनी हा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले. (Shiv Sena MP Gajanan Kirtikar political journey)

कोण आहेत गजानन किर्तीकर

बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असलेल्या गजान किर्तीकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे बालपण गिरगावसारख्या मराठी वस्तीत गेले. घरची परिस्थिती बेताची असूनही गजानन किर्तीकर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांनी मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली.

गजानन किर्तीकर यांची राजकीय कारकीर्द

शिवसेनेच्या शाखेतून कामाला सुरुवात करणाऱ्या गजानन किर्तीकर यांनी पक्षात अनेक पदे भुषविली. ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये काम केले. या काळात अनेक मराठी मुलांना नोकऱ्या मिळवून देण्यात किर्तीकर यांनी पुढाकार घेतला.

1990 साली ते पहिल्यांदा मालाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चारवेळेला ते आमदार झाले. 1995 ते 1998 या काळात गजानन किर्तीकर गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री होते. 1998 ते 99 या काळात ते नारायण राणे यांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन मंत्री होते.

शाळेतील हुशार विद्यार्थी

गजानन किर्तीकर यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण मुगभाट प्रायमरी शाळा आणि गिरगाव अप्पर प्रायमरी शाळेत झाले. त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा गजानन किर्तीकर यांनी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण केली होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आर्यन शाळेत दाखल झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना 67 टक्के गुण मिळाले. यानंतर ते रिझर्व्ह बँकेत कॉईन आणि नोट एक्झामिनर’ म्हणून नोकरीला लागले. ही नोकरी करतानाच गजानन किर्तीकर यांनी पार्टटाईम कोर्सला प्रवेश घेतला. 1970 साली ते अर्थशास्त्र विषय घेऊन पदवीधर झाले.

गिरगावातील सभा आणि आंदोलनांमुळे सामाजिक कार्याची आवड

गजानन किर्तीकर यांचे बालपण गिरगावात गेले. महाराष्ट्राची जडणघडण सुरु असतानाचा काळ त्यांना जवळून अनुभवायला मिळाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि चळवळीतील सभा, मोर्चे आणि आंदोलने मी जवळून पाहात होतो. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या सभांना उपस्थित राहून देशाच्या मोठमोठ्या नेत्यापुढाऱ्यांची भाषणे ऐकायचा मला छंद जडला होता. नवशक्ती, मराठा आणि नवाकाळ सारखी दैनिके नियमित वाचत होतो. आचार्य अत्रे, नीळुभाऊ खाडीलकरांचा अग्रलेख वाचल्याशिवाय मला चैन पडत नसे. त्या साऱ्यांचा कळत-नकळत माझ्यावर परिणाम झाल्याचे किर्तीकर यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेतील दक्षिण भारतीयांच्या अरेरावीमुळे शिवसेनेत प्रवेश

गजानन किर्तीकर रिझर्व्ह बँकेत नोकरीला असताना याठिकाणी दाक्षिणात्य मंडळींचे प्राबल्य होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेत दाक्षिणात्य लॉबीचा वरचष्मा होता. ही गोष्ट गजानन किर्तीकर यांना प्रचंड खटकत असे. याच काळात बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ या मासिकातून या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला सुरुवात केली.

बाळासाहेबांची ही शैली गजानन किर्तीकर यांना प्रचंड भावली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेतील दक्षिण भारतीयांच्या अरेरावीमुळे त्यांचे मन आणखी पेटून उठले. या भावनेतूनच गजानन किर्तीकर यांनी दादर रेल्वे स्थानकासमोरच्या पर्लसेंटरमध्ये असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात जाण्यास सुरुवात केली. तेव्हापासून गजानन किर्तीकर शिवसेनेत सक्रिय झाले. 1966 साली त्यांनी नोकरी सोडून शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली.

(Shiv Sena MP Gajanan Kirtikar political journey)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.