AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics | राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात, बहुमत चाचणी रोखण्याची मागणी

बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यावर सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

Maharashtra Politics | राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात, बहुमत चाचणी रोखण्याची मागणी
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 29, 2022 | 11:04 AM
Share

मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला उद्या बुहमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी (Bhagat singh Koshyari) दिले आहेत. या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात (Superme court) पोहोचली आहे. उद्याच बहुमत चाचणी होऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार उद्या विधानभवनात बहुमत चाचणीला सामोरं जाईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने निर्णय दिला तर उद्या होणारी बहुमत चाचणी पुढे ढकलली जाऊ शकते. किंवा शिवसेनेची याचिका फेटाळली तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला उद्या उरल्या सुरल्या आमदारांच्या बळावर बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार. भाजपच्या नेत्यांनी कालच राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत चाचणीस सामोरं जाण्यास सांगावे, अशी मागणी केली. त्यानुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

याचिका प्रलंबित असताना फ्लोअर टेस्ट कशी?

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी फ्लोअर टेस्ट रोखण्याची मागणी केली आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यावर सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

फ्लोअर टेस्ट लांबवण्याची याआधीही विनंती

सोमवारी सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. शिंदे गटातील 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई संबंधी याचिका पूर्णपणे निकाली लागेपर्यंत फ्लोअर टेस्ट घेण्यात येऊ नये, अशी विनंती शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टातील याचिकांचा निकाल लागेपर्यंत सरकारची कामे खोळंबण्यासंबंधीच निकाल देता येणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य कोर्टाने केलं होतं. यानंतरही बहुमत चाचणीदरम्यान काही आक्षेप असल्यास महाविकास आघाडी सरकार कोर्टात धाव घेऊ शकते, असे वक्तव्य न्यायमूर्तींनी केलं होतं. आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिका प्रलंबित असतानाही आता राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचा आदेश दिल्याने शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलावून महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. आमदारांवर फैसला येईपर्यंत बहुमत चाचणी करता येत नाही. मात्र फडणवीसांच्या पत्रानंतर राजभवन कामाला लागले. त्यांच्या कामाचा वेग पाहता मोदींनी आणलेल्या राफेल विमानापेक्षाही प्रचंड हा वेग प्रचंड आहे, असी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...