‘मातोश्री’च्या अंगणात थेट उद्धव ठाकरेंना शिवसेना आमदाराचं चॅलेंज

‘मातोश्री’च्या अंगणात थेट उद्धव ठाकरेंना शिवसेना आमदाराचं चॅलेंज

वांद्रे पूर्व मतदारसंघातील (Vandre East Shivsena Candidate) विद्यमान आमदार तृप्ती बाळा सावंत (Vandre East Shivsena Candidate) या तिकीट कापल्याने बंडखोरी करणार आहेत.

सचिन पाटील

|

Oct 04, 2019 | 1:01 PM

मुंबई : राज्यभरातील उमेदवारीचा तिढा सोडवताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या ‘मातोश्री’च्या (Vandre East Shivsena Candidate) अंगणातील वाद मिटवता आला नाही, असं चित्र आहे. कारण वांद्रे पूर्व मतदारसंघातील (Vandre East Shivsena Candidate) विद्यमान आमदार तृप्ती बाळा सावंत (Vandre East Shivsena Candidate) या तिकीट कापल्याने बंडखोरी करणार आहेत. तृप्ती सावंत यांच्याऐवजी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तृप्ती सावंत अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

वांद्रे पूर्व खेरवाडीच्या विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंड केल्याचं चित्र आहे.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा तिकीट नाकारल्याने तृप्ती सावंत नाराज आहेत. समर्थकांच्या पाठिंब्याने थोड्याच वेळात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी

शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वांद्रे पूर्व’ या मतदारसंघाचा तिढा सोडवताना शिवसेना पक्षप्रमुखांची दमछाक झाली. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डच्चू देत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Mayor Vishwanath Mahadeshwar) यांच्या गळ्यात (Vandre East Shivsena Candidate) टाकली आहे.

तृप्ती सावंत यांना पुन्हा संधी देण्यावरुन पक्षामध्ये खलबतं सुरु होती. तृप्ती सावंत यांना उमेदवारी द्यावी की त्यांचं तिकीट कापून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना रिंगणात उतरवावं, याविषयी चर्चा झाली. अखेर तृप्ती सावंत यांना डावलून महाडेश्वरांच्या पारड्यात मत (Vandre East Shivsena Candidate) पडलं.

पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश (बाळा) सावंत दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले होते. सावंतांनी भाजपच्या कृष्णा पारकर यांचा पराभव केला होता. मात्र 2015 मध्ये सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

2014 मधील निवडणुकीनंतर भाजप-सेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तर भाजपने उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र नारायण राणे काँग्रेसकडून रिंगणात उतरले होते.

‘मातोश्री’च्या अंगणातील जागा पटकावण्याच्या इरेने उतरलेल्या नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

संबंधित बातम्या 

‘मातोश्री’च्या अंगणाचा तिढा सुटला, उद्धव ठाकरेंनी ठरवलं वांद्रे महापौरांचे!  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें