AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election : शिवसेनेने हिंदुत्व सोडले, भाजपला बिहारमध्ये फरक पडणार नाही, भाजप खासदाराचा निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.

Bihar Election : शिवसेनेने हिंदुत्व सोडले, भाजपला बिहारमध्ये फरक पडणार नाही, भाजप खासदाराचा निशाणा
| Updated on: Oct 08, 2020 | 12:31 PM
Share

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपनेदेखील बिहार निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. (Shiv Sena will not make any difference to BJP in Bihar Election says MP Bhagwat Karad)

शिवसेनेच्या बिहार निवडणूक लढण्याचा निर्णयाबाबत बोलताना भाजपचे खासदार भागवत कराड म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेना उमेदवारांमुळे काहिही फरक पडणार नाही. शिवसेना केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. शिवसेनेमुळे भाजपला बिहारच्या निवडणुकीत कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा केव्हाच सोडला आहे. त्यामुळे शिवसेनेला बिहारमध्ये काहीही मिळणार नाही.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच या निवडणुकांसाठी प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नावे

1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2. आदित्य ठाकरे 3. सुभाष देसाई 4. संजय राऊत 5. चंद्रकांत खैरे 6. अनिल देसाई 7. विनायक राऊत 8. अरविंद सावंत 9. गुलाबराव पाटील 10. राजकुमार बाफना 11. प्रियांका चतुर्वेदी 12. राहुल शेवाळे 13. कृपाल तुमाने 14. सुनिल चिटणीस 15. योगराज शर्मा 16. कौशलेंद्र शर्मा 17. विनय शुक्ला 18. गुलाबचंद दुबे 19. अखिलेश तिवारी 20. अशोक तिवारी

शिवसेना 50 जागा लढवणार

शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राष्ट्रवादींकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

दरम्यान काल (7 ऑक्टोबर) राष्ट्रवादीने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे. संबंधित बातम्या

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक

(Shiv Sena will not make any difference to BJP in Bihar Election says MP Bhagwat Karad)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.