शिवसेनेच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? काही तासात दोनदा मातोश्रीवर, IT विभागाच्या रडारवर

शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटीवरुन आयकर विभागाने आता आक्रमक पाऊलं उचलण्यास सुरवात केली आहे. यामिन जाधव या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध महानगरपालिकेशीही लावला जाणार हे निश्‍चित आहे.

शिवसेनेच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? काही तासात दोनदा मातोश्रीवर, IT विभागाच्या रडारवर
शिवसेना आमदार यामिनी जाधव
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 8:33 PM

मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटीवरुन आयकर विभागाने आता आक्रमक पाऊलं उचलण्यास सुरवात केली आहे. यामिन जाधव या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध महानगरपालिकेशीही लावला जाणार हे निश्‍चित आहे. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांचं आर्थिक उत्पन्न, गुंतवणूक, व्यवहार या सगळ्याची चौकशी करण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आयकर विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रवर्तन निर्देशनालय निवडणूक आयोग यांच्याकडे पाठपुरावा सुरु केलाय. या पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. (ShivSena’s Byculla MLA Yamini Jadhav twice met CM Uddhav Thackeray)

यामिनी जाधव प्रकरणात आयकर विभागाने आणखी खोलात जाऊन तपास केल्यानंतर जाधव परिवाराचे प्रधान डिलर्स प्रा. लिमिटेड या बोगस कंपनी सोबत आर्थिक व्यवहार आहेत. तसंच या कंपनीचे संचालक एंट्री ऑपरेटर उदय शंकर महावार यांच्या नियंत्रणाखाली हे सगळे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. उदय शंकर महावार यांचं नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही समोर आलं होतं. त्यावेळी यंग इंडिया नावाच्या कंपनी महावार यांच्या कंपनीने कर्ज दिलं होतं. याप्रकरणात आयकरने त्यांची चौकशीही केली होती. यात त्यांनी शेल कंपन्यांची माहिती पुरवण्यात सहभाग असल्याची कबुली दिली होती.

मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून!

यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम कर्ज स्वरूपातील नाही, तर हा त्यांचाच पैसा असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती चुकीची असल्याचं आयकर विभागानं नोंदवलं आहे. नॅशनल हेरॉल्ड, कर्ज अनियमितता आणि मनी लाँडरिंग केल्याचा ठपका ठेवत आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: या परीस्थीतीचा आढावा घेतला. या प्रकारणसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्याची जाधव यांची ही दुसरी वेळ आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत आणि यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहे. स्थायी समितीत महानगरपालिकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांना मंजूरी दिली जाते. त्यामुळे या समितीवर नेहमीच आरोप होत असतात. आतापर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपाच्या चौकशीत त्याचा थेट संबंध ठाकरे कुटूंबियांशी लावता आलेला नाही. मात्र, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी असलेली व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात आल्यास फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हे परवडणारे नाही. त्यामुळे शिवसेनेचं टेंशन वाढलं असल्याचं समजतं. तसंच गेल्या काही वर्षात पालिकेत जे घोटाळे उघड झाले, त्याचा थेट संबंधही शिवसेनेशी लागलेला नसून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्री हस्तक्षेप करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

इतर बातम्या : 

Video : विरोधक म्हणतात हे सरकार तीन चाकी रिक्षा, अजित पवारांनी चक्क इलेक्ट्रीक रिक्षाच चालवून बघितली!

केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करते हा काय प्रश्न आहे का?, लढलेंगे इससे भी; सुप्रिया सुळे आक्रमक

ShivSena’s Byculla MLA Yamini Jadhav twice met CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.