शिवभोजन थाळीची घोषणा शिवसेनेची, उपक्रम महाविकासआघाडीचा : छगन भुजबळ

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये शिवभोजन कार्यालयाचे उद्धाटन करण्यात (Chhagan bhujbal on shivbhojan thali) आले.

Chhagan bhujbal on shivbhojan thali, शिवभोजन थाळीची घोषणा शिवसेनेची, उपक्रम महाविकासआघाडीचा : छगन भुजबळ

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळी प्रकल्पाला आजपासून सुरुवात (Chhagan bhujbal on shivbhojan thali)  झाली. जिल्हाच्या पालकमंत्र्यांनी ठिकठिकाणी शिवभोजन कार्यालयात शिवथाळी सुरु केली. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये शिवभोजन कार्यालयाचे उद्धाटन करण्यात (Chhagan bhujbal on shivbhojan thali) आले.

नाशिक शहरात एकूण 4 शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले. नाशिककरांना अवघ्या 10 रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे. प्रत्येक केंद्रात एका दिवसात 150 गरजूंना भोजन मिळेल. यावेळी छगन भुजबळ यांनी निरोगी जेवण द्यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.

“शिवभोजन ही महाविकासआघाडीच्या समान किमान कार्यक्रमाची ही संयुक्त योजना आहे. शिवभोजन थाळीची घोषणा जरी शिवसेनेची असली तरी उल्लेख मात्र महाविकासआघाडीचा उपक्रम म्हणून येणार आहे,” असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

“प्रत्येकाला वागण्याचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून यात वाढ होणार आहे. महिलांना आणि गरिबांना काम देणारा हा उपक्रम आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार निगराणी ठेवणार आहे,” असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

“या पायलट प्रोजेक्टमध्ये राज्यभरात 18 हजार गरिबांना जेवण मिळणार आहे. तर पुढे भविष्यात ही संख्या लाखांपर्यंत जाईल,” असेही भुजबळ (Chhagan bhujbal on shivbhojan thali) म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *