ठाकरे गटाकडून अभिनव डेलकर यांची हकालपट्टी, दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून हटवलं
शिवसेना ठाकरे गटाकडून दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून दादरा नगर हवेली च्या राज्य प्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपने जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यप्रमुख पदावरून अकालपट्टी केली असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
आता प्रभारी राज्यप्रमुख कोण ?
अभिनव डेलकर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे सांगत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता श्वेतल भट यांची प्रभारी राज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनव डेलकर हे दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर आणि विद्यमान खासदार कलमाबेन डेलकर यांचे पुत्र आहेत. शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपनं जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली . तर दुसरीकडे अभिनव डेलकर यांची ठाकरे गटाने हकालपट्टी केली आहे. आता श्वेतल भट यांची प्रभारी राज्य प्रमुख पदाचा कारभार सांभाळतील.
