Shivjayanti 2022 : “संभ्रम निर्माण करू नका”, खासदार Vinayak Raut यांचं Amol Mitkari यांना आवाहन
Shivjayanti 2022 : आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यात आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी विरूद्ध शिवसेना-मनसे असा वाद निर्माण झालाय.
मुंबई : आज तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यात आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) विरूद्ध शिवसेना-मनसे (Shivsena- MNS) असा वाद निर्माण झालाय. मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणालेत. त्यावरूनच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी मिटकरींना सुनावलं आहे. “अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत. त्यामुळे शिवजयंतीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून येतंय.
विनायक राऊत काय म्हणाले?
“अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत. “शिवसेना शिवजयंती तिथीनुसारच साजरी करते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही प्रथा चालू केली आणि आता देशभर, जगभर ती पाळी जाते”, असं राऊत म्हणालेत. त्यामुळे शिवजयंतीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून येतंय.
शिवाय भगव्याचे राज्य हा शिवसेनेचा शिवजयंतीनिमित्त संकल्प असल्याचंही राऊत म्हणाले. “शिवसैनिक शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है यासाठी शिवसंकल्प अभियान आमचा विदर्भ पासून सुरू झाला आहे”, असंही राऊतांनी यावेळी सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
अमोल मिटकरी यांचं विधान
अमोल मिटकरी यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे. शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं त्यांनी म्हटलंय. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे, असंही मिटकरी म्हणालेत.
“राज्य सरकारने 2000 मध्ये 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख जाहीर केली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तिथीचा वाद उकरुन , मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करणं आता बंद झालं पाहिजे. राज्यातील तरुणांची अशीच इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून विश्वव्यापक दृष्टीकोनातून पाहावं”, असं अमोल मिटकरी म्हणालेत.
दरम्यान, मिटकरींच्या या विधानावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आक्षप घेतला. “आपण सणवारही तिथीनुसार साजरे करतो तर मग शिवजयंतीही तिथीनुसार साजरी केली जाणार. मिटकरी फालतू विधान करून प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करतात”, असं अमेय खोपकर म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
संबंधित बातम्या