जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड; बिडेन यांच्या मागे शुक्लकाष्ठ!

जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड; बिडेन यांच्या मागे शुक्लकाष्ठ!
नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

गेल्या दोन वर्षांच्या रेटींगमध्ये 2 मे 2020 रोजी मोदी यांची लोकप्रियता शिखरावर होती. त्यांना या काळात 84 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची लोकप्रियता घटलेली दिसली. कारण 7 मे 2021 रोजी त्यांचे अप्रूव्हल रेटिंग 63 टक्क्यांपर्यंत खाली घसरले. मात्र, इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च राहिले आहे.

मनोज कुलकर्णी

|

Mar 21, 2022 | 1:17 PM

अमेरिकेतील (America) ग्लोबर लीडर अप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) ने जगभरातील नेत्यांची अप्रूव्हल रेटिंग जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तब्बल 77 टक्के अप्रूव्हल रेटिंग घेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेत. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात मोदी यांनी जगभरातील 13 नेत्यांना छोबीपछाड देत आपला नंबर अव्वल ठेवलाय. भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करून दिलीय. मोदींच्या नंतर दुसऱ्या स्थानी आहेत मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर. त्यांना 63 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळालीय. त्यानंतर इटलीच्या मारिया द्राघी यांना 54 टक्के, तर जपानच्या Fumio Kishida यांना 45 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. त्यातही विशेष म्हणजे या नेत्यांबद्दल निगेटिव्ह अप्रूव्हल रेटिंगही घेण्यात आले होते. त्यातही मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वात कमी म्हणजे फक्त 17 टक्के आहे. जानेवारी 2020 ते मार्च 2022 पर्यंत या काळात हे अप्रूव्हल रेटिंग घेण्यात आले. त्यात सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून मोदीची अव्वल ठरले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घसरण

गेल्या दोन वर्षांच्या रेटींगमध्ये 2 मे 2020 रोजी मोदी यांची लोकप्रियता शिखरावर होती. त्यांना या काळात 84 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची लोकप्रियता घटलेली दिसली. कारण 7 मे 2021 रोजी त्यांचे अप्रूव्हल रेटिंग 63 टक्क्यांपर्यंत खाली घसरले. मात्र, इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च राहिले आहे. त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना अनुक्रमे 42 टक्के आणि 41 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले. हे दोन्ही नेते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी राहिलेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे 33 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह सर्वात मागे आहेत.

बिडेन देशांतर्गत समस्यांनी त्रस्त

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अथक निस्वार्थी सेवेच्या बळावरच जागतिक पातळीवर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे कौतुक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचे अप्रूव्हल रेटिंग त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सर्वात खालच्या स्तरावर गेलेले दिसले. कोरोनाचे मृत्यू, अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याची माघार याचा त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला. आता युक्रेनचे संकट आणि देशांतर्गत समस्यामुळे त्यांचे अप्रूव्हल रेटिंग अजून घसरण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें