आदित्य ठाकरे रात्री उशिरा आमदारांच्या भेटीला, चर्चेनंतर हॉटेलमध्येच मुक्काम

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा मलाडच्या हॉटेल 'द रिट्रीट'मध्ये शिवसेना आमदारांची भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील आमदारांसोबत हॉटेलमध्ये मुक्कामी केला.

आदित्य ठाकरे रात्री उशिरा आमदारांच्या भेटीला, चर्चेनंतर हॉटेलमध्येच मुक्काम

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान, राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी विचारणा केल्यानंतर (Governor invite Devendra Fadnavis) मुंबईत राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेनेचे वरळी मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा मालाडच्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये शिवसेना आमदारांची भेट घेतली (Aditya Thackeray meet MLA’s). त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील आमदारांसोबत हॉटेलमध्येच मुक्कामी केला. ते अद्यापही याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत (Aditya Thackeray at Hotel The Retreat).

राज्यपालांकडून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्यात आल्यानंतर शिवसेनेत घडामोडींना वेग आला. आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना मालाडच्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये थांबवलं आहे. आदित्य ठाकरे हे शनिवारी रात्री साडे 12 वाजताच्या सुमारास मातोश्रीवरुन रवाना झाले. त्यानंतर त्यांनी हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये आमदारांची भेट घेतली. आमदारांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरेही याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापनेच्या (Governor invite Devendra Fadnavis) शक्यतांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी (Government Formation) आवश्यक बहुमत सिद्ध करण्याविषयी विचारणा केली आहे. राज्यपालांच्या विचारणेनंतर आता भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपाच्या 50-50 फॉर्म्युल्यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप बहुमताची तजवीज कशी करणार हा प्रश्न आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या निमंत्रणावर उद्या (10 नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपाला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच, मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI