भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार, सेना नेते म्हणाले, ‘ही तर बाळासाहेबांची शिकवण!’

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 7:20 AM

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार, सेना नेते म्हणाले, 'ही तर बाळासाहेबांची शिकवण!'
शिवसेनेकडून केंद्रिय राज्यमंत्र्यांचा सत्कार

ठाणे : केंद्रीय मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार

कपिल पाटील हे भिवंडी लोकसभेचे खासदार असून बदलापूर शहर हे भिवंडी लोकसभेत येतं. या मतदारसंघाचे खासदार केंद्रात राज्यमंत्री झाल्यामुळे कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं बदलापूर शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं.

त्यातच बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला.

ही तर बाळासाहेबांची शिकवण…!

याबाबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारलं असता, आपल्या स्थानिक खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून निवड होणं, ही शहरासाठी आनंदाची बाब असून एखाद्या वरिष्ठांचं स्वागत करणं, शहरात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही शिवसेनेची आणि बाळासाहेबांची शिकवण असल्याचं वामन म्हात्रे म्हणाले.

कपिल पाटील मंत्री झाले ही शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब

तसंच कपिल पाटील हे युतीचे खासदार म्हणून निवडून गेले असून त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून झालेली निवड ही बदलापूर शहरातल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा आनंदाची बाब असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण त्यांना बदलापूर शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली असून कपिल पाटील यांनीही विकासकामांना गती देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं वामन म्हात्रे यांनी सांगितलं.

(Shivsena badlapur City president Waman Mhatre homage Minister BJP kapil patil)

हे ही वाचा :

..आणि चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं!

भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI