सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली, विनोदांचा पाऊस

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर …

सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली, विनोदांचा पाऊस

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.

शिवेसना-भाजपच्या या युतीवर मात्र अनेकांनी टीका केली. शिवसेना आणि भाजपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे, तर शिवसेनेची खिल्ली उडवणारे अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. शिवसेना गेली साडेचार वर्ष भाजपसोबत सत्तेत आहे. मात्र सत्तेत असून शिवसेनेने नेहमीच विरोधकाची भूमिका घेत भाजपवर टीका केली. विरोधकाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत अनेकदा स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. याचा अनेकांनी विरोध करत सोशल मीडियावर शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावरील शिवसेनेची खिल्ली उडवणाऱ्या काही पोस्ट

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *