Video : आधी दुसऱ्या फळीतील नेते म्हणाले युती होऊ शकते, आता थेट प्रवीण दरेकरांनी ठाकरेंची गाडी अडवून युतीबाबत स्पष्ट सांगितलं

भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवल्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही तिथे पोहोचले. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेत्यांमध्ये झालेला संवाद शिवसेना-भाजप युतीबाबत होता!

Video : आधी दुसऱ्या फळीतील नेते म्हणाले युती होऊ शकते, आता थेट प्रवीण दरेकरांनी ठाकरेंची गाडी अडवून युतीबाबत स्पष्ट सांगितलं
प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली


मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आयोजित बैठकीनंतर विधान भवन परिसरात राज्याच्या राजकारणातील एक अनोखं चित्र आज पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवन परिसरातून बाहेर पडत असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवल्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही तिथे पोहोचले. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेत्यांमध्ये झालेला संवाद शिवसेना-भाजप युतीबाबत होता! (Praveen Darekar blocked CM Uddhav Thackeray’s car, comment on ShivSena-BJP alliance)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेली बैठक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपचं सरकार येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेली भावना शिवसेनेच्या अनेक आमदार आणि नेतेमंडळींची असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते, असा दावाही काही भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, आता थेट प्रवीण दरेकर यांनीच युतीबाबत भाष्य केलं आहे.

विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं?

या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात विधानभवन परिसरात झालेला संवाद हा देखील युतीच्या मुद्द्यावर झाला असल्याचं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री विधान भवन परिसरातून बाहेर पडत असतानाच तिथे उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. मुख्यमंत्र्यांनीही आपली गाडी थांबवली. तेव्हा भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं निवेदन स्वीकारत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवल्याचं पाहून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर तिथे आले. त्यावेळी नार्वेकर आणि दरेकरांमध्ये झालेला संवाद हा युतीबाबत होता!

नार्वेकर आणि दरेकरांमधील संवाद असा :

मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का?

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो.

मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत या, शिबबंधन बांधूया.

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.

गाडीत एकालाच प्रवेश मिळेल

गप्पागोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले. तेव्हा तिघांनीही आम्हाला तुमच्या गाडीत घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर एकालाच गाडीत प्रवेस मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला.

संबंधित बातम्या :

VIDEO: दरेकर, महाजनांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून घ्या!

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित

“14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

Praveen Darekar blocked CM Uddhav Thackeray’s car, comment on ShivSena-BJP alliance

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI