AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानानंतर शिवसेना-भाजपची बैठक रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेना भाजपमधील बैठक रद्द करण्यात आली (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानानंतर शिवसेना-भाजपची बैठक रद्द
| Updated on: Oct 29, 2019 | 4:25 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे. यासाठी आज भाजप शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेना भाजपमधील बैठक रद्द करण्यात आली (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात याबाबतची बोलणी होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे. यामुळे ‘मातोश्री’ मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवलं आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे