AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

'सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत.' असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी 'तो' व्हिडीओच लावला
| Updated on: Oct 29, 2019 | 2:22 PM
Share

मुंबई : अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना त्यांचाच व्हिडीओ दाखवत फॉर्म्युलाची आठवण करुन (Sanjay Raut to Devendra Fadanvis) दिली आहे. ‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत’ असं म्हणत संजय राऊत यांनी 50-50 च्या फॉर्म्युलाकडे भाजपचं लक्ष वेधलं.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, या देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावरुन ‘टीव्ही9 मराठी’ने संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देण्याआधीच राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ लावून दाखवला. लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच 18 फेब्रुवारी 2019 रोजी युतीची घोषणा करतानाचा हा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ आहे.

‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा, डिक्शनरीमधील व्याख्या अजून बदललेल्या नाहीत.’ असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणलं आहे. ‘वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असं वाटू शकतं’, असा टोमणाही फडणवीसांनी लगावला. दिवाळीनिमित्त पत्रकारांसोबत रंगलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

‘राजकारणात मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे की नाही हे आम्ही ठरवू. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लिहिलं म्हणून 2014 मध्ये सरकार आलं, हे विसरु नका’ अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं. मी ‘सामना’मधून पक्षाच्याच भूमिका मांडतो. ज्या निवडणुकांपूर्वी भूमिका ठरल्या होत्या, त्या द्या, असंही राऊत म्हणाले. ‘सामना’वर आमची नाराजी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याविरोधात तर असं लिहून पहा, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

‘त्यांच्याकडे 146 आमदारांचं संख्याबळ असेल, तर त्यांना कोण रोखणार? मी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा चंद्रकांत पाटील, शरद पवार कोणीही म्हणालं, आमच्याकडे 146 आमदारांचं संख्याबळ आहे, तर त्यांना कोण रोखणार? उद्या एकनाथ खडसे आले जळगावातून आणि म्हणाले माझ्याकडे 145 संख्याबळ आहे, तर ते मुख्यमंत्री होतील’ असं संजय राऊत (Sanjay Raut to Devendra Fadanvis) म्हणाले.

‘भाजपचे राष्ट्रीय नेत्यांनी येऊन समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही काय हट्टाला पेटलेले आणि चुकीच्या मागण्या करत बसलेले नाही आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, माझ्यावर फणा काढून बोलण्याची गरज नाही’ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

पावसात भिजावं लागतं, हा अनुभव कमी पडला, फडणवीसांचे पवारांना चिमटे

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.