नितेश राणेंचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न, शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सत्कार केलाय.

नितेश राणेंचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न, शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार
आमदार नितेश राणेंकडून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मोर्चा संपल्यानंतर परत जाताना काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. दरम्यान शिवसेना भवन हे आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढायचा नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपला दम भरला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सत्कार केलाय. (Nitesh Rane felicitates BJP Yuva Morcha)

‘राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास दिलाय. इतकंच नाही तर शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही केलाय. राम जन्मभूमी ट्रस्टवर बिनबुडाचे आरोप करून हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येत असल्याचा आरोप कर भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.

भाजयुमोच्या 40 कार्यकर्त्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित 40 कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नितेश राणेंची शिवसेनेवर घणाघाती टीका

शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. त्यानंतर ‘जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला’, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

Video : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा

भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, माजी महापौर श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा, अटकेसाठी भाजपचा ठिय्या

Nitesh Rane felicitates BJP Yuva Morcha workers

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI