AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम शिवसेनेच्या मंत्र्यावर संतापले, भर सभागृहात गृहमंत्र्यांना ओपन चॅलेंज

कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी होते. | Ramdas Kadam

रामदास कदम शिवसेनेच्या मंत्र्यावर संतापले, भर सभागृहात गृहमंत्र्यांना ओपन चॅलेंज
| Updated on: Mar 03, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई: कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. (Shivsena leader Ramdas Kadam slams own party minister)

अर्थसंकल्पीय अधिवेनशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रकार घडला. यावेळी रामदास कदम यांनी म्हटले की, कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी होते. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की शासकीय अधिकारी असून त्यांचे फोटो बॅनरवर लागले. हजारोंच्या गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्या उपस्थित होत्या. कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत फोटोसह गृहमंत्र्यांना सहावेळा पत्र दिले. पण, त्यांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. शिवसेनेचे गृह राज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत.

विरोधी पक्षाची कदमांना साथ, गृहमंत्र्यांचं आश्वासन

विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचे आवाहन केले. यावर, नोटीस देऊन मी त्या मंत्र्याचे सभागृहात नाव घेऊ शकतो. मला कोणती अडचण नाही असे सांगतानाच तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी अनिल देशमुख यांना दिले. मला विधानभवन पायऱ्यांवर उपोषणाला बसायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. यावर, कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

भर सभागृहात मुनगंटीवार शिवसेना नेत्याला म्हणाले, तुम्ही सीएमपदाचे मटेरियल, राज्यमंत्र्यासारखी कृती नको!

मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार : चित्रा वाघ

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(Shivsena leader Ramdas Kadam slams own party minister)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.