विधानसभेनंतर शिवसेनेचं 'मिशन पुणे महापालिका', संजय राऊतांचे शिवसैनिकांना आदेश

राज्यातल्या सत्ताकरणाच्या नाट्यातील हिरो ठरलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut pune) यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना 'मिशन पुणे महापालिका' हा कार्यक्रम दिला आहे.

Shivsena Sanjay Raut pune, विधानसभेनंतर शिवसेनेचं ‘मिशन पुणे महापालिका’, संजय राऊतांचे शिवसैनिकांना आदेश

पुणे : राज्यातल्या सत्ताकरणाच्या नाट्यातील हिरो ठरलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut pune) यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना ‘मिशन पुणे महापालिका’ हा कार्यक्रम दिला आहे. त्यासोबतच आता 50 नगरसेवक निवडून आणण्याचे आदेशही दिले आहेत. गेल्या काही काळापासून संजय राऊत (Shivsena Sanjay Raut pune) यांनी जे जे ठरवलं ते करूनच दाखवलं आहे.

वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त संजय राऊत पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सेना भवनमध्ये नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत महापालिकेतील शिवसेनेची कामगिरी आणि प्रभागरचनेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय गणितं मांडताना त्यांनी ताकद वाढविण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

पुणे महापालिकेत शिवसेनेचे सध्या दहा नगरसेवक आहेत. पुण्यात विधानसभेला शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे शिवसेनेत नाराजी होती. पण निवडणूक निकालानंतर घडलेल्या सत्तानाट्यानंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झालेला आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रभाग बैठका घेतल्या जात आहे. संजय राऊत हे पुण्याच्या कारभारात लक्ष घालतील असं शिवसैनिकही म्हणत आहेत.

“संजय राऊत यांनी ‘मिशन पुणे महापालिका’ हा कार्यक्रम दिला असला तरी, हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे”, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज्यातल्या सत्तानाट्यात हिरो ठरलेल्या संजय राऊत यांचा करिष्मा पुण्यात चालेल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी शहर पातळीवर शिवसेनेची ताकद वाढणं आवश्यक आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *