AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सिलिंडरवर बसलेली बाई… मोदींवरही ठो-ठो बरसात, सुषमा अंधारेंच्या भाषणातले 5 मुद्दे!

सुषमा अंधारेंनी काल शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेत केलेलं धडाकेबाज भाषण ऐकणाऱ्यांच्या, वाचाणाऱ्यांच्या मनावर गारूड करतंय. या भाषणातले 5 मुद्दे Video सहित----

Video | सिलिंडरवर बसलेली बाई... मोदींवरही ठो-ठो बरसात, सुषमा अंधारेंच्या भाषणातले 5 मुद्दे!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2022 | 2:37 PM
Share

ठाणेः शिवसेनेची बुलंद तोफ मानले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोठडीत आहेत. मात्र नुकत्याच शिवसेनेत पदार्पण झालेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची एकानंतर एक येणारी धाडसी वक्तव्य राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहेत. सुषमा अंधारेंना हळू हळू लेडी संजय राऊत असंही म्हटलं जातंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भाषणापेक्षाही सुषमा अंधारेंचं भाषण अधिक ठसलं, असे थेट बोललं जातंय. याच सुषमा अंधारेंनी काल शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेत केलेलं धडाकेबाज भाषण ऐकणाऱ्यांच्या, वाचाणाऱ्यांच्या मनावर गारूड करतंय. या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे Video सहित—-

ठाण्यातल्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक कँपेनवरून जोरदार खिल्ली उडवली. एका जाहिरातीची आठवण करून देत त्या म्हणाल्या, ‘ एक ताई टीव्हीवर दिसायच्या. सिलिंडरवर बसायच्या.. बहुत हो चुकी महंगाईची मार.. अबकी बार… ही ओळ पूर्ण न करताच अंधारे म्हणाल्या, अब की बार… ये अत्याचार नही… यावेळी सुषमा अंधारे यांचे हावभाव पाहण्यासारखे होते..

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदेसाहेब फक्त कळसूत्री बाहुलीसारखे फडणवीसांच्या इशाऱ्यावर करतात. एकिकडे गर्वगर्जना यात्रेला लोकं भाड्याने आणले तरी बसत नाहीयेत. तर इकडे अलोट गर्दी दिसतेय… त्यामुळे येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार हे निश्चित….’

आनंद दिघे साहेबांचा सच्चा वारसदार ठाणे जिल्ह्याचे वाघ..बोके हळूच लोणी खाऊन पळून जातात… वाघ लढतो फक्त बोलून दाखवतो… तेच आमचे एकनिष्ठ, आदरणीय खासदार राजन विचारे… अशी ओळख सुषमा अंधारे यांनी करून दिली…

भाषणात एका ठिकाणी सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच नक्कल केली. भाषपवर निशाणा साधताना.. भाईयो और बहनो… हे लोक नुसतीच मन की बात करतात, पण जनतेच्या काय मुख्य समस्या आहेत, यावर कुणीच बोलत नाहीत.

भाषणाच्या सुरुवातीलाच सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेचं कारण स्पष्ट केलं.. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शूरवीर, लढवैय्ये, त्यागांची महती सांगितली… अखेरीस हा महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे, असं ठासून सांगितलं…

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.