भाजपानं विकृतीला स्वीकारलं, राणेंचा पाचवा पराभव करणार : विनायक राऊत

शिवसेना-भाजप युती झाली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. कोकणात शिवसेना-भाजपमधील हा संघर्ष (Fighting between Shivsena BJP) टोकाला गेला आहे.

भाजपानं विकृतीला स्वीकारलं, राणेंचा पाचवा पराभव करणार : विनायक राऊत
Follow us
| Updated on: Oct 09, 2019 | 9:39 AM

रत्नागिरी: शिवसेना-भाजप युती झाली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. कोकणात शिवसेना-भाजपमधील हा संघर्ष (Fighting between Shivsena BJP) टोकाला गेला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रवेश दिल्याने भाजपवर सडकून टीका (Vinayak Raut Criticize BJP) केली. भाजपनं विकृतीला स्वीकारलं आहे, मात्र आम्ही नितेश राणेंच्या (Vinayak Raut on Nitesh Rane) रुपात राणेंचा पाचवा पराभव करु, अशी जहरी टीका राऊत केली.

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात आहेत. मात्र, त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे. विनायक राऊत यांनी राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले, “शिवसेनेचे दुश्मन असलेल्या राणेंना तिकिट देवू नका अशी भाजपला वारंवार विनंती केली होती. नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार होवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असंही शिवसेनेने स्पष्ट केलं होतं. मात्र, दुर्दैवाने भाजपने या विकृतीला स्वीकारलं.”

‘साप तो साप, ढंख मारणारच’

विनायक राऊत यांनी राणेंचं नाव न घेता त्यांना साप असल्याचं म्हटलं. राऊत म्हणाले, “साप हा साप असतो. तो ढंख मारणारच. नितेश राणे शिवसेनेवर काही बोलणार नसले, तरी आम्हाला फरक पडत नाही. त्यांनी पुतणामावशीचं हे प्रेम दाखवू नये.” यावेळी राऊत यांनी शिवसेनेचे कणकवलीतील उमेदवार सतिश सावंत यांना लोकांमधून पाठिंबा वाढत असल्याचंही म्हटलं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.