VIDEO : पुढे येण्यासाठी राऊतांनी हात पकडला, नाराज भास्कर जाधवांनी हात झटकला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (17 फेब्रुवारी) गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन (bhaskar jadhav unhappy) झाले.

VIDEO : पुढे येण्यासाठी राऊतांनी हात पकडला, नाराज भास्कर जाधवांनी हात झटकला 


रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (17 फेब्रुवारी) गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन (bhaskar jadhav unhappy) झाले. या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंच्या समोरच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भास्कर जाधवांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे बोललं जात आहे.

गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी उद्धव ठाकरेंचा सत्कार केला. या सत्कारानंतर फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर विनायक राऊत स्वत: भास्कर जाधव यांना बोलवण्यासाठी गेले. त्यावेळी राऊतांनी जाधवांना सगळ्यांसोबत यायची विनंती केली. मात्र तेव्हाही त्यांनी हात झटकत नकार दर्शवला. तसेच त्यांना या कार्यक्रमासाठी नारळ वाढवण्याची विनंती करण्यास सांगितल्यावरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान हा सर्व प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समोर घडला. तसेच भर कार्यक्रमात मंचावर घडत असलेला हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यातही कैद (bhaskar jadhav unhappy) झाला.

“आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपलं सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचं काम आपण सर्व जण मिळून करु,” असे उद्धव ठाकरे यावेळी (bhaskar jadhav unhappy) म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI