कोकणात शिवसेना आणि मनसेत सत्ता संघर्ष पेटला, राज्यातील मनसेच्या एकमेव नगराध्यक्षांचीही उचलबांगडी होणार?

कोकणात शिवसेना आणि मनसेत सत्ता संघर्ष पेटला, राज्यातील मनसेच्या एकमेव नगराध्यक्षांचीही उचलबांगडी होणार?

शिवसेनेचे दिग्गज नेते असणाऱ्या माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या होमपीचवर सध्या सेना विरुद्ध मनसे असा राजकीय आखाडा रंगलाय

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 04, 2021 | 3:39 PM

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर आलीय. त्यातच शिवसेनेचे दिग्गज नेते असणाऱ्या माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या होमपीचवर सध्या सेना विरुद्ध मनसे असा राजकीय आखाडा रंगलाय. खेडचे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात आधीच तब्बल 11 अपात्रतेचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेत. त्यात आज आणखी 4 प्रस्तावांची भर पडलीय. अशाप्रकारे मनसे नेते आणि खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधातील अपात्रता ठरावांची एकूण संख्या 15 झालीय. त्यामुळे मनसेचा नगराध्यक्ष असलेल्या खेड नगरपरिषदेतूनही मनसेची उचलबांगडी होते की काय असं चित्र तयार झालंय (Shivsena MNS political fight in Kokan demand resignation of Khed Mayor).

एकूण सर्वसाधारण सभेचा ठराव परस्पर बदलणे, नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये मनसेचे पक्ष प्रवेश घेवून राजशिष्ठाचाराचा भंग अशा गंभीर आरोपांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलाय. त्यामुळे मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात आता 15 अपात्रतेचे प्रस्ताव दाखल झालेत. शिवसेनेच्या 9 नगरसेवकांच्या स्वाक्षरीने नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात हा अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय.

“नगराध्यक्षांच्या दालनात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेवून राजशिष्ठाचाराचा भंग”

विशेष म्हणजे नगराध्यक्षांच्या दालनात मनसेच्या पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम घेवून राजशिष्ठाचाराचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी केलेत. नगराध्यक्षांच्या दालनात पक्षाचे पक्ष प्रवेश घेतल्याचे फोटो पुरावे दाखवत शिवसेनेने मनसे नगराध्यक्षांची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

नव्याने सादर झालेले 4 अपात्रतेच्या प्रस्तावात नेमकं काय?

1. 30 जानेवारी 2021 रोजीच्या सर्व साधारण सभेचा ठराव क्रमांक 122 नगरसेवकांच्या विभागातील प्रत्येकी 2 कामांना मंजूरी देणे. हा ठराव झाल्यानंतर त्यात 15 कामे दाखवून हा ठराव बदलल्याचा आरोप नव्या झालाय.

2. 11 मार्च 2020 चा 137 वा ठराव विकासकामांना मंजूरी देण्यात आली. याच ठरावात दवाखाना दुरुस्ती अशा जुन्या ठेकेदाराचा ठेका कायम करण्यात आल्याचा आरोप.

3. नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये मनसेचा पक्ष प्रवेश. सत्कार आणि पुप्पगुच्छाचा खर्च देखील नगरपालिकेतून झाल्याचा सेनेचा आरोप.

4. नगरोत्थान योजनेतून शहरातील संरक्षित भिंत बांधताना सागाच्या झाडाची तोड करण्यात आली. 15 झाले तोडूनही त्याची चौकशी नाही. तक्रारी येवून सुद्धा चौकशी समिती नेमली नाही, असा शिवसेनेचा आरोप आहे.

खेड नगरपरिषदेच्या राजकारणात सेना विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरु आहे. मात्र शिवसेनेच्या आरोपावर नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात आपलं काम नियमांना धरून आहे. आपण लढणार असून रडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच अपात्रतेच्या संदर्भात दाखल केलेल्या सर्व आरोपांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुराव्यानिशी उत्तर दिलं जाईल, असंही खेडेकर यांनी नमूद केलं.

मनसेचा नगराध्यक्ष असलेली खेडची नगरपरिषद महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद आहे. वैभव खेडेकर जनतेमधून निवडून आले आहेत. त्यामुळे नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या अधिक असूनही सत्ता मनसेकडे गेल्याने याची शिवसेनेला बोच आहे. त्यामुळे शिवसेनेने सध्या मनसेला घेरण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जातंय.

हेही वाचा :

रामदास कदमांच्या होमपीचवर शिवसेना आक्रमक, मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाविरुद्ध अपात्रतेचा ठराव

मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

रामदास कदम आणि सूर्यकांत दळवींची गटबाजी तटकरेंच्या पथ्यावर?

व्हिडीओ पाहा :

Shivsena MNS political fight in Kokan demand resignation of Khed Mayor

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें